शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये ३४ ट्रकसह जेसीबी, १३६ ब्रास रेती केली जप्त

By admin | Updated: June 17, 2017 01:51 IST

खारघरमधून अवैध रेती उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्याची दखल घेत खारघर येथे महसूल व पोलिसांनी

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघरमधून अवैध रेती उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्याची दखल घेत खारघर येथे महसूल व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ३४ ट्रक, जेसीबीसह १३६ ब्रास रेती असा कोट्यवधींचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त नितीन पवार, पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सकाळी ६ वाजता ही कारवाई करण्यात आली. कारवाईत ३४ ट्रक, एक जेसीबीसह एकूण १३६ ब्रास रेती असा जवळपास कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी तब्बल ५० पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता. खारघरमधील ही कारवाई महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या मोठ्या कारवाईपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. जप्त केलेले ट्रक व त्यातील रेती, रॉयल्टीबाबत खारघर पोलीस तपासणी करीत आहेत. अनेक वर्षांपासून तळोजा गावातून अवैध रेती उपसा करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असली तरी एवढ्या वर्षांपासून सुरू असलेला हा अवैध रेती व्यवसाय महसूल विभागाच्या निदर्शनास आला नाही का, हा देखील प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.