शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इर्शाळवाडी: 300 चौरस मीटरचा मिळणार भूखंड; जबाबदारी आता सिडकोवर

By कमलाकर कांबळे | Updated: August 20, 2023 08:46 IST

आरसीसी संरक्षण भिंतीचे कवच, घर बांधण्यासाठी सिडकोची खरी कसोटी

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: इर्शाळवाडीतील आपद्ग्रस्तांच्या पुनर्वसनाचा अंतिम विकास आराखडा तयार झाला आहे. त्यानुसार या मंजूर आराखड्यानुसार आपद्ग्रस्त आदिवासींचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता सिडकोवर सोपविली आहे. दरडींची दुर्घटना टाळण्यासाठी पुनर्विकसित इर्शाळवाडीस आरसीसी संरक्षण भिंतीचे संरक्षण राहणार आहे.

रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलेल्या २.६ हेक्टर जागेवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अवघ्या आठ दिवसांत पुनर्वसनाचा हा विकास आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा महिन्यांत इर्शाळवाडीतील आपद्ग्रस्तांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण होईल, असे स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जाहीर करून जलद कार्यवाही करण्याचे निर्देशसुद्धा संबंधित विभागाला दिले होते. 

इर्शाळवाडीतील दरड कोसळण्याच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी २७ जुलै रोजी  राज्य रस्ते विकास महामंडळाला पत्र पाठवून दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यानंतर, तहसीलदार कार्यालय, भूमी अधीक्षक व मोजणी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी  १ ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्वसनासाठी सूचित केलेल्या  जागेची पाहणी केली. त्यानंतर  जीआयएस (GIS) या अद्ययावत सॉफ्टवेअर प्रणालीनुसार हा आराखडा तयार केला. राज्य शासनाच्या निर्देशानुसार एमएसआरडीसीने विकास  आराखडा तयार केला असला तरी त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी  सिडकोची आहे. परंतु, सिडकोचा ढिला कारभार पाहता सहा महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होईल का, अशी शंका जाणकारांकडून उपस्थित केली जात आहे.

४४ घरांसह या महत्त्वाच्या सुविधा

या आराखड्यानुसार इर्शाळवाडी आपद्ग्रस्तांसाठी ४४ पक्की घरे बांधली जाणार आहेत. प्रत्येक घराचे क्षेत्रफळासाठी  ३०० चौरस मीटरचा भूखंड असणार आहे.  महत्त्वाचे म्हणजे प्रस्तावित केलेली जागा  काही प्रमाणात जमिनीपासून उंचावर असल्यामुळे भविष्यात कुठलाही धोका असणार नाही. तो टाळण्यासाठी नियोजित जागेच्या सर्व बाजूस आरसीसी  संरक्षण भिंत प्रस्तावित केली आहे. तसेच या आराखड्यामध्ये प्राथमिक शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, उद्यान, खेळाचे मैदान,  प्राथमिक आरोग्य केंद्र आदी  सोयी-सुविधांसाठी भूखंडाचे नियोजन केले आहे.

रस्त्यासाठी गुरचरण जमीन

  इर्शाळवाडी आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी नानिवली गावातील २.६ हेक्टर जागा निश्चित केली आहे.   पुनर्वसन ठिकाणावरून जाण्यासाठी  खाली असलेल्या नानिवली गावामधून दोन प्रवेश मार्गांचे पर्याय सुचवले आहेत.   पहिला १८२ मीटरचा आहे.   तर दुसरा ३५० मीटर लांबीचा असून तो तुलनेने सपाटीवर आहे.   दोन्ही रस्त्यांचे पर्याय हे शासकीय गुरचरण जमिनीमधून प्रस्तावित आहेत.   त्यामुळे या रस्त्यांसाठी शासनाला नव्याने  जमीन संपादित करावी लागणार नसल्याचे  विकास आराखड्यात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Raigadरायगडcidcoसिडको