शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

नवी मुंबईमध्ये एक लाख नागरिकांची तपासणी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 01:24 IST

आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केली असून, यामध्ये अँटिजेन चाचण्यांची संख्या सर्वाधिक आहे.

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने मिशन ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून जास्तीतजास्त चाचण्या घेण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केली असून, यामध्ये अँटिजेन चाचण्यांची संख्या सर्वाधिक आहे. शहरात २२ ठिकाणी ही तपासणी केंद्र सुरू केली आहेत.नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने दीर्घकालीन नियोजन केले आहे. जास्तीतजास्त नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळली, तरीही तत्काळ अँटिजेन चाचणी केली जात आहे. रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांचीही तपासणी केली जात आहे. कोणत्याही स्थितीत चाचणी करण्यास टाळाटाळ करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आयुक्तांनी पदभार स्वीकारला, तेव्हा एकूण चाचण्यांची संख्या २७,२४९ झाली होती. सद्यस्थितीमध्ये ही संख्या एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. एक महिन्यात ७० हजारपेक्षा जास्त तपासण्या केल्या असून, त्यात अँटिजेन चाचण्यांची संख्या सर्वाधिक आहे. महानगरपालिकेने २२ ठिकाणी अँटिजेन तपासणी केंद्र सुरू केली आहेत. याशिवाय कंटेन्मेंट झोनमध्ये विशेष शिबिरांचेही आयोजन केले जात आहे. आता ‘अँटिजेन टेस्ट आपल्या घरापर्यंत’ ही संकल्पना पालिका राबवत असून, यासाठी ‘मिशन झीरो नवी मुंबई’ उपक्रम हाती घेण्यात आला. या अंतर्गत ६ जनजागृतीपर प्रचाररथ आणि ३४ मोबाइल अँटिजेन टेस्टिंग व्हॅन कार्यान्वित करण्यात आल्या आणि सोसायटी, वसाहतींमध्ये जाऊन अँटिजेन टेस्ट्स सुरू केल्या आहेत.या चाचणीत ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये लक्षणे आढळत आहेत, त्यांची लगेच आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. याशिवाय बाधित व्यक्तीच्या अतिनिकटच्या संपर्कातील व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व किडनीचे विकार असे आजार असणाºया कोमॉर्बिड व्यक्तींचीही आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे अशा व्यक्तींची टेस्ट केल्यानंतर त्या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त होईपर्यंत त्यांचे विलगीकरण केले जाते आहे. महानगरपालिकेने स्वत:ची प्रतिदिन १,००० टेस्टिंग क्षमता असणारी अद्ययावत संपूर्ण आॅटोमॅटिक आरटीपीसीआर लॅब नेरूळ येथील महानगरपालिका रुग्णालयात कार्यान्वित केली असून, २४ तासांच्या आत रिपोर्ट मिळत आहेत. या लॅबमधून आतापर्यंत ३,२५७ तपासण्या पूर्ण झाल्या आहेत.>सोसायट्यांमध्येही चाचणीमहानगरपालिकेने १० आॅगस्टपासून ‘मिशन झीरो नवी मुंबई’ उपक्रमांतर्गत सोसायट्या, वसाहतींमध्ये जाऊन अँटिजेन टेस्टिंगला सुरुवात केली असून, १६ आॅगस्टपर्यंत ६९ सोसायट्यांमध्ये ६,९९९ व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यामधील ३२५ टेस्ट्स पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.>वैद्यकीय अधिकाऱ्यांशी रोज संवादमहानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत वैद्यकीय अधिकारी व विभाग अधिकारी यांच्याशी दररोज सायंकाळी वेब संवाद साधला जात आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी तज्ज्ञांशीही संवाद साधला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या