शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कांदा-बटाट्याची अवैध विक्री सुरूच

By admin | Updated: June 3, 2017 06:39 IST

भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर बाजार समिती, वाहतूक पोलीस व महापालिकेच्या आशीर्वादाने कांदा - बटाट्याची अवैध विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर बाजार समिती, वाहतूक पोलीस व महापालिकेच्या आशीर्वादाने कांदा - बटाट्याची अवैध विक्री सुरू आहे. यामुळे रोज या परिसरात वाहतूककोंडी होत आहे. पालिकेच्या पदपथाचा वापर गोडावूनप्रमाणे केला जात असून याविषयी ठोस कारवाई केली जात नसल्याने निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. मुंबई बाजार समिती आवारामध्ये अन्नपूर्णा चौक ते माथाडी भवन दरम्यान रोज वाहतूककोंडी होवू लागली आहे. या वाहतूककोंडीला भाजी व फळ मार्केटच्या बाहेरील फेरीवाले व कांदा-बटाट्याची अवैध विक्री करणारे पूर्णपणे जबाबदार आहेत. भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर व विस्तारित मार्केटच्या मध्ये २६ व्यापारी कांदा - बटाट्याची विक्री करत आहेत. पादचाऱ्यांच्या सुविधेसाठी बनविलेल्या पदपथावर शेकडो गोणी उतरवून ठेवल्या जात आहेत. यामुळे पदपथाची सुरक्षाच धोक्यात आली आहे. पदपथ खचण्याची शक्यता आहे. याशिवाय अतिक्रमणामुळे नागरिकांना रोडवरून चालावे लागत आहे. रोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. कांदा - बटाट्याच्या अवैध व्यापाराविरोधात ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर काही दिवस विक्रेत्यांनी येथील व्यवसाय थांबला होता, परंतु नंतर पुन्हा सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कारवाई करण्यासाठी गेलेल्या बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकांना व्यापाऱ्यांनी हुसकावून लावले. अवैध विक्रेत्यांना वाहतूक पोलीस व महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे अभय मिळत आहे. विभाग कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी कोणी कितीही विरोध केला तरी आम्ही तुम्हाला पाठिंबा देवू अशी आश्वासने दिली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारवाई केलीच जात नसल्याने आता काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एपीएमसी वाहतूक चौकीमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांविषयी पोलीस आयुक्त व उपआयुक्तांकडे व पालिका कर्मचाऱ्यांची महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असून आयुक्त तरी यावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंढेही काही करू शकले नाहीतभाजी मार्केटच्या बाहेरील अवैध कांदा -बटाटा विक्रेत्यांना महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे. यामुळे काही व्यापारी तुकाराम मुंढे असतानाही आमच्यावर कोणी कारवाई करू शकले नाही, मग रामास्वामी एन. यांना भिण्याचे काहीच कारण नाही अशा वल्गना केल्या जावू लागल्या आहेत.बेलापूरमध्ये कारवाई एपीएमसीमध्ये अभय पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी बेलापूरमध्ये फेरीवाल्यांना अभय दिल्यामुळे दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. परंतु एपीएमसीमध्ये वारंवार तक्रारी होवून व प्रसारमाध्यमांनी आवाज उठवूनही कारवाई न करणाऱ्यांवर मात्र काहीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.