शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

अवैध माल वाहतूक करणारे डंपर सुसाट

By admin | Updated: May 1, 2017 06:29 IST

वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत; परंतु नवी मुंबईत

 कमलाकर कांबळे / नवी मुंबईवाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत; परंतु नवी मुंबईत या नियमाला सपशेल हरताळ फासला गेला आहे. विशेषत: रेती आणि खडीची वाहतूक करणाऱ्या डंपरमालकांनी या नियमाला केराची टोपली दाखविली आहे. या प्रकाराला प्रादेशिक उपपरिवहन कार्यालयाचा (आरटीओ) अर्थपूर्ण पाठिंबा मिळत असल्याने हे डंपरचालक सुसाट सुटल्याचे दिसून येते.सुरक्षिततेच्या दृष्टीने क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करण्यास मनाई आहे. तसे उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेल्याने वाहनाचे नुकसान होते. तसेच अपघाताची शक्यता वाढते. अधिक माल भरल्याने अनेकदा मोठे अपघात झाल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर मालवाहू वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करण्याचे स्पष्ट निर्बंध आहेत. नवी मुंबईत तर वाहतूकदारांनी हे निर्बंध साफ धुडकावून लावले आहेत.नवी मुंबईतून मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात खडी व क्रश सॅण्डची वाहतूक केली जाते. नियमानुसार एका डंपरमधून १५ टन माल वाहून नेण्याची मुभा आहे. प्रत्यक्षात मात्र ३0 ते ४0 टन इतका माल वाहून नेला जातो. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई होणे अपेक्षित आहे; परंतु संबंधित विभागानेही अर्थपूर्ण चुप्पी साधल्याने दिवसेंदिवस या अवैध वाहतुकीला चालना मिळताना दिसत आहे. दरम्यान, नवी मुंबईचे आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी या प्रकाराचा इन्कार केला आहे. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई केली जाते. त्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रात क्षमतेपेक्षा अधिक खडी व कॅ्रश सॅण्डची वाहतूक करणारा आतापर्यंत एकही डंपर आढळला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. असे असले तरी यासंदर्भात अधिक चौकशी करून दोषी आढळणाऱ्या डंपरवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.दिवसाला ४000 फेऱ्यामुंबईच्या विविध उपनगरांत नवी मुंबईतील पनवेल, उरण परिसरातून खडी आणि क्रश सॅण्डची वाहतूक केली जाते. त्यासाठी जवळपास दीड हजार डंपर दिवस-रात्र चालतात. एक डंपर दिवसाला किमान दोन फेऱ्या मारतो. त्यानुसार दिवसाला जवळपास चार हजार फेऱ्या होतात. विशेष म्हणजे डंपरमध्ये क्षमतेपेक्षा ३0 ते ४0 टन अधिक माल भरल्याचे दिसून येते.वसुलीसाठी दलालांची नियुक्तीडंपरमधून क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेण्यासाठी डंपरचालकांकडून बेकायदा वसुली केली जाते. सूत्राच्या माहितीनुसार प्रत्येक डंपरमागे महिन्याला १७,५00 रुपयांचा हप्ता द्यावा लागतो. हप्ता वसुलीसाठी दलालांची नेमणूक करण्यात आली आहे. या दलालांकडे माल घेऊन मुंबईत जाणाऱ्या प्रत्येक डंपरचा क्रमांक असतो. प्रत्येक महिन्याच्या १ ते १0 तारखेपर्यंत हप्त्याची रक्कम जमा करणे गरजेचे असते. हप्ता दिलेल्या डंपरला तपासणी न करता सोडून दिले जाते. तर हप्त्याची रक्कम न आलेल्या डंपरला अडवून दंडात्मक कारवाई केली जाते, अशी माहिती सूत्राने दिली.गोळा होणाऱ्या रकमेची विभागणी?सध्या पनवेल येथील गव्हाण कोपरा, जासई आणि कुंडे वाडा येथून खडी आणि क्रश सॅण्डची मुंबई उपनगरात वाहतूक केली जाते. आरटीओचा वरदहस्त असल्याने बहुतांशी डंपरमधून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक केली जाते. त्यासाठी दलालांच्या माध्यमातून गोळा केल्या जाणाऱ्या हप्त्याची रक्कम पेण, पनवेल, नवी मुंबई, वडाळा, अंधेरी व बोरीवली या आरटीओतील संबंधित अधिकाऱ्यांना विभागून दिली जाते, अशी धक्कादायक माहिती सूत्राने दिली आहे.