शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उरणमधील कचऱ्यामुळे कांदळवनाचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 22:45 IST

सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार; कचरा न टाकण्याचे आदेश

नवी मुंबई : उरण नगरपालिका कार्यक्षेत्रामधील कचरा बोरी पाखाडीजवळील कचरा भुमीवर टाकला जात असून त्यामुळे कांदळवन नष्ट होत आहे. याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनी कोकण पाणथळ तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली आहे. समितीने कांदळवनामध्ये कचरा टाकू नये अशा सूचना दिल्या आहेत.नगरपालिका कार्यक्षेत्रामधील कचरा टाकण्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी अशी मागणी जिल्हाअधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. जिल्हाअधिकाºयांनी सन २००० मध्ये हनुमान कोळीवाड्याजवळील बोरी पाखाडी येथे भूखंड उपलब्ध करून दिला होता. त्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. या कचºयामुळे कांदळवन नष्ट होत असल्याची तक्रार नॅट कनेक्ट संस्थेचे बी. एन. कुमार व श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे नंदकुमार पवार यांनी केली होती. याविषयी कोकण पाणथळ तक्रार निवारण समितीच्या बैठकीमध्येही तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेवून जिल्हाअधिकारी प्रशासनास कांदळवनावर कचरा टाकला जावू नये. कांदळवनात जो कचना टाकला असेल तो काढून घेण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. यासाठी एक समितीने घटनास्थळी जावूनही पाहणी केली होती. कांदळवन समितीच्या आदेशामुळे कचरा भुमीमुळे त्रस्त असणाºया नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पर्यावरण प्रेमींनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.बोरी पाखाडी मधील कचरा भुमीमुळे परिसरामधील नागरिक त्रस्त झाले होते. कांदळवन नष्ट होवून पर्यावरणाची हानी होत होती. याविषयी अनेक महिन्यांपासून आम्ही पाठपुरावा करत असून कांदळवन समितीने दिलेल्या निर्णयामुळे या लढ्यास यश आले आहे.- बी. एन. कुमार, संस्थापक, नॅड कनेक्ट फाऊंडेशनकचरा भुमीविषयी कांदळवन समितीने काही आदेश दिले असल्याचे ते अद्याप आमच्यापर्यंत पोहचलेले नाहीत. जिल्हाअधिकाºयांनी दिलेल्या जमीनीवरच कचºयाचे विल्हेवाट लावली जात आहे. खारफुटी नष्ट होणार नाही याची काळजी घेत आहोत. पर्यायी जमीन मिळविण्यासाठीही आमचा पाठपुरावा सुरू आहे.- अवधूत तावडे, मुख्याधीकारी, उरण नगरपालिका