शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोर महिलेला सहा महिने कारावास; न्यायालयाने सुनावली शिक्षा

By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 2, 2023 18:47 IST

बनावट व्हिजा वापरून करत होती वास्तव्य 

नवी मुंबई : बनावट व्हिजा वापरून वास्तव्य करणाऱ्या विदेशी महिलेवर पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात कारवाई केली होती. न्यायालयाने तिला सहा महिन्यांची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड सुनावलं आहे. तर कारावास भोगल्यानंतर तिला युगांडा या तिच्या मूळ देशात हद्दपार केले जाणार आहे. 

तळोजा परिसरात राहणाऱ्या विदेशी महिलेकडे भारतात वास्तव्याची बनावट कागदपत्रे असल्याचे विशेष शाखेच्या सतर्कतेमुळे समोर आले होते. त्यानुसार तळोजाचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गोरे, विशेष शाखेचे निरीक्षक विशाल माने यांच्या पथकाने ऑगस्ट महिन्यात या महिलेवर कारवाई केली होती. मूळच्या युगांडाच्या राहणाऱ्या या महिलेने दुसऱ्या व्यक्तीच्या व्हिजाच्या प्रतीमध्ये स्वतःची माहिती भरून तो व्हिजा मूळ असल्याचे भासवून नवी मुंबई पोलिसांकडे जमा केला होता. परंतु तिची चलाखी विशेष शाखा पोलिसांच्या लक्षात येताच तिला अटक करण्यात आली. तिच्यावर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पनवेल न्यालयालयात तिच्यावर दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. त्यावर २७ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी झाली असता सरकारी वकील जयश्री कुलकर्णी यांनी मांडलेल्या सबळ पुराव्या आधारे न्यायाधीशांनी सदर विदेशी महिलेला ६ महिने कारावास व १ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.