शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये इंटरनेट सेवा कोलमडली

By admin | Updated: June 14, 2017 03:20 IST

तालुक्यात एमटीएनएलची इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून पुरती कोलमडली आहे. इंटरनेट सेवा कोलमडल्याचा फटका उरण तालुक्यातील जेएनपीटी, शेवा,

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : तालुक्यात एमटीएनएलची इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून पुरती कोलमडली आहे. इंटरनेट सेवा कोलमडल्याचा फटका उरण तालुक्यातील जेएनपीटी, शेवा, एनएडी, जासई, उरण शहर आदि विभागातील हजारो ग्राहकांना बसला आहे. बंद पडलेल्या इंटरनेट सेवेमुळे मंगळवारी दहावीचा निकालही शेकडो विद्यार्थी, पालकांना सायबर कॅफेत जाऊन पैसे मोजून पहावा लागल्याने एमटीएनएलच्या गलथान कारभाराबाबत ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.उरण तालुक्यातील एमटीएनएलची इंटरनेट सेवा मागील महिनाभरापासून कोलमडली आहे. खंडित झालेल्या इंटरनेट सेवेचा फटका येथील हजारो ग्राहकांबरोबरच परिसरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनाही बसला आहे. याबाबत तक्रार करण्याचीही सोय उरलेली नाही. कारण तक्रार घेवून जाणाऱ्या ग्राहकांना उरण एमटीएनएलचे अधिकारी तकलादू आणि थातूरमातूर उत्तरे देवून वाटेला लावून देत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या संतापाचा पारा अधिकच चढू लागला आहे. मंगळवारी दहावीचा रिझल्ट आॅनलाइन जाहीर करण्यात आला होता. मात्र बंद पडलेल्या इंरटनेट सेवेमुळे मंगळवारी दहावीचा रिझल्टही शेकडो विद्यार्थी पालकांनी सायबर कॅॅफेत जावून पैसे मोजून पहावा लागला. त्यामुळे अनेक ग्राहकांनी एमटीएनएलच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली असता उरण जासई दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामामुळे वारंवार आॅप्टिकल फायबरच्या केबल्स तोडल्या जात आहेत. त्यामुळेच उरणमधील इंटरनेट सेवा कोलमडली असल्याची माहिती डीएम एल. आर. यादव यांनी दिली. दुरुस्तीचे काम सुरू असून अधिक माहितीसाठी जीएम कार्यालयाशी संपर्क साधावा असा सल्लाही त्यांनी दिला.एमटीएनएलचे जीएम नंदलाल सत्यदेव यांनीही उरण परिसरातील इंटरनेटसेवा मागील पाच दिवसांपासून कोलमडली असल्याचे मान्य करून दुरुस्तीनंतरच सेवा पूर्वपदावर येणार असल्याचा दावा केला आहे. याबाबत कामगार सेनेचे अध्यक्ष खा. अरविंद सावंत यांनीही लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.मात्र उरण येथील एमटीएनएलच्या दुरुस्तीचे काम अद्याप तरी सुरू झाले नसल्याने इंटरनेट सेवा कधी पूर्वपदावर येईल याची शाश्वती नसल्याचे कर्मचाऱ्यांकडूनच सांगण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या इंटरनेट सेवा दुरुस्तीमध्ये अधिकारी वर्गालाच फारसे स्वारस्य नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्यात कामचुकार अधिकारी जादा जबाबदार असल्याचा आरोपही कर्मचारी वर्गातून केला जात आहे.मात्र उरण परिसरातील कोलमडलेल्या इंटरनेट सेवेमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष आहे.