शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

पनवेल क्षेत्रात शिवसेनेत अंतर्गत कलह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 02:52 IST

गटबाजीचे राजकारण : नव्या नेमणुकांनंतर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

वैभव गायकर

पनवेल : ऐन विधानसभेच्या तोंडावर पनवेल शिवसेनेत अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका करण्यात आल्या आहेत. या नेमणुका करताना अनेक जुन्या पदाधिकाºयांना डावलून नव्याने नेमणुका करण्यात आल्याने शिवसेनेतील एक गट नाराज आहे. या नाराज गटाने आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत, त्यामुळे सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.पनवेल महापालिका निवडणुकीत सेनेला एकही जागेवर यश संपादित करता आले नाही. पालिका निवडणुकीत भाजप युतीसाठी आग्रही असताना सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला. स्वबळावर निवडणूक लढवून सेनेला भोपळाही फोडता आला नसल्याने सेनेमध्ये अंतर्गत दुफळी निर्माण झाली.

वर्षभरापूर्वी पनवेल क्षेत्रासाठी शिवसेनेच्या काही महत्त्वाच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या. या वेळी रायगडचे तत्कालीन संपर्क प्रमुख संजय मोरे यांच्याविरोधात पक्षातील पदाधिकाºयांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.लोकसभा निवडणुकीत पनवेल तालुक्यातून मावळ लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांना चांगले मताधिक्य मिळाले. यात मित्रपक्ष भाजपचाही मोठा वाटा होता. मात्र, सेनेचा उमेदवार असल्याने सेनेतील पदाधिकाºयांमध्ये नवचैतन्य संचारले होते. यानंतर जुलै महिन्यात झालेल्या पदाधिकाºयांच्या निवडीबाबत पुन्हा एकदा नाराज गटाने राजीनामे दिले आहेत. यामध्ये ३२ आजी-माजी पदाधिकाºयांचा समावेश असून अनेक वर्षांपासून तालुक्यात प्रामाणिकपणे कार्य करणाºया पदाधिकाºयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, तालुक्यात भाजप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या सर्व पक्षांचे नगरसेवक महापालिकेत पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. एकीकडे सेनेच्या उभारणीचे प्र्रयत्न सुरू असताना सेनेतील अंतर्गत गटबाजी संपण्याचे नाव घेत नाही.आगामी विधानसभा निवडणुकीत राज्य पातळीवर सेना-भाजपची युती होईल की नाही? असा प्रश्न निर्माण झाला असताना पनवेल विधानसभेतील सेनेचा अंतर्गत कलह सेनेला चांगलाच महागात पडू शकतो. त्यामुळे नाराज पदाधिकाºयांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. राजीनामा दिलेल्या पदाधिकाºयांमध्ये कळंबोली शहरप्रमुख अविनाश कोंडिलकर, विभागप्रमुख घनश्याम नाईक, विभागप्रमुख विश्वास पेटकर आदीसह इतर पदाधिकाºयांचा समावेश आहे.सेनेमध्ये अनेक वर्षांपासून प्रामाणिक काम करीत आहे. त्यामुळे पक्षाने नव्याने संधी देणे गरजेचे आहे. मी प्रभाग क्रमांक ९ मधील विभागप्रमुख पदाचा राजनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे. सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून माझे काम सुरूच राहणार आहे.- विश्वास पेटकर,विभागप्रमुख, प्रभाग ९पनवेल क्षेत्रातील सर्व पदाधिकाºयांनी राजीनामे दिलेले नाहीत, तर केवळ कळंबोलीमधील पदाधिकाºयांनी राजीनामे दिले आहेत. ती संख्या १० ते १२ जणांची आहे. नाराज पदाधिकाºयांची समजूत काढून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणार आहोत.- प्रथमेश सोमण,महानगर संघटक, पनवेल शिवसेना

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल