शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष

By admin | Updated: December 26, 2016 06:31 IST

रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका म्हणून पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली आहे. मंगळवार २७ डिसेंबर रोजी

वैभव गायकर / पनवेलरायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका म्हणून पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली आहे. मंगळवार २७ डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत पार पडणार आहे. या सोडतीकडे सर्वांचे लागून राहिले आहे. प्रतिष्ठेच्या अशा महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाची कसोटी लागणार आहे. अनेकांनी याकरिता तयारी देखील सुरू केली असून आरक्षणानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नव्या वर्षातच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. महापालिकेने प्रभाग रचनेचा आराखडा देखील तयार केला आहे. ३0 डिसेंबर रोजी या प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीला पनवेल महापालिका क्षेत्राची लोकसंख्या १0 लाखांच्या घरात आहे. या महानगरपालिकेचे क्षेत्रफळ ११0.0६ चौ. कि. मी. इतके आहे. नवी मुंबई महापालिकेपेक्षा हे क्षेत्रफळ जास्त आहे. खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, तळोजा आदी नोडचा यामध्ये समावेश आहे. तसेच औद्योगिक वसाहत, विशेष आर्थिक क्षेत्र, नवी मुंबई विमानतळ आदिंमुळे या महानगरपालिकेला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा या महानगरपालिकेवर आपले वर्चस्व असावे, या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. असे असले तरी खरी चुरस भाजपा व शेकाप या दोन पक्षांत असणार आहे. त्याचबरोबर शिवसेना भाजपासोबत जाते की, अन्य पर्यायाचा विचार करते हे सुध्दा तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व समाजवादी पक्ष शेकापबरोबर जातील, असे आडाखे बांधले जात आहेत. त्याशिवाय प्रत्येक नोडमधील स्थानिक आघाड्या, फोरम निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागल्या आहेत. एकूणच विविध राजकीय पक्षांबरोबरच अनेकांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. पॅनल पद्धतीने या निवडणुका होणार आहेत. एकूण २0 प्रभाग सदस्य संख्या ७८ एवढी असणार आहे. यामध्ये महिला सदस्य संख्या ३९ एवढी असणार आहे. १९ हजारांपासून २८ हजारांपर्यंत एक प्रभाग असणार आहे.मंगळवार, २७ डिसेंबर रोजी पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आरक्षणाची सोडत सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. याद्वारे नव्या वर्षात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग /मागासवर्ग प्रवर्गातील महिला, सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित होणार आहे.