शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल महामार्गासाठी संपादित जमिनीची परस्पर विक्री

By admin | Updated: February 12, 2017 03:23 IST

सायन-पनवेल मार्गासाठी शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन परस्प

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई सायन-पनवेल मार्गासाठी शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन परस्पर खासगी कंपनीला विकण्यात आली आहे. हा प्रकार निदर्शनास येताच कंपनीच्या तक्रारीनुसार गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने ३९ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सायन-पनवेल मार्गासाठी शासनाने १९६५ साली २ हेक्टर ८८ आर जमीन संपादित केली होती. प्रत्यक्षात त्यापैकी १ हेक्टर १८ आर जमिनीचा रस्त्यासाठी वापर झालेला असून, उर्वरित जमीन अद्यापही शासनाच्या ताब्यात आहे; परंतु संपादित करूनही वापर न झालेली जमीन परत मिळावी यासाठी नवी मुंबईतील काही शेतकऱ्यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यास शासनाच्या संबंधित विभागाने नकार दिला होता. मोबदला देऊन संपादित केलेली जमीन परत देता येत नसल्याचे शासनाचे धोरण आहे. संपादित केलेली परंतु वापर न झालेली जमीन केवळ शासनाच्याच इतर उपक्रमासाठी वापरली जाऊ शकते. अथवा अशा जमिनीचा जाहीर लिलाव करून विक्री केली जाते. या धोरणानुसार त्या शेतकऱ्यांना संपादित केलेली जमीन परत देण्यास शासनातर्फे नकार मिळाला होता. असे असतानाही त्या शेतकऱ्यांनी शासनाच्या ताब्यातील जमीन परस्पर विकल्याचा प्रकार घडला आहे. प्रमुख तिघांच्या साहाय्याने या शेतकऱ्यांनी व त्यांच्या नातेवाइकांनी ही जमीन विक्रीसाठी काढली होती. त्यानुसार सायन-पनवेल मार्गालगतची जमीन विक्रीसाठी निघाल्याची माहिती अतुल गोयल व गोपाल मोहटा यांना मिळाली होती. यानुसार त्यांनी संबंधितांकडे चौकशी केली असता, शासनाने रस्त्यासाठी संपादित केलेली जमीन परत दिलेली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. शिवाय अशा प्रकारच्या आदेशपत्राच्या झेरॉक्स प्रतीही त्यांना देण्यात आल्या होत्या. यानुसार गोयल व मोहटा यांनी संबंधित शेतकऱ्यांना एक कोटी रुपये देऊन जमिनीचा व्यवहार केला होता. मात्र, यानंतर त्यांनी मूळ कागदपत्रांची मागणी केली असता, त्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. यावरून त्यांना संशय आल्यामुळे परस्पर चौकशी केली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. यामुळे झालेल्या प्रकाराची तक्रार गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे करण्यात आली होती. दरम्यान याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नसून अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांनी सांगितले. याप्रकरणी तीन महिन्यांच्या तपासाअंती ३९ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांनी कंपनीसोबत व्यवहारासाठी वापरलेली कागदपत्रे बनावट असल्याचेही निष्पन्न झाले असून, ही कागदपत्रे त्यांनी कोणाकडून बनवली याचाही अधिक तपास सुरू आहे. - शिवाजी आवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर्थिक शाखा