शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या मनुष्यबळाचा पोलिसांवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 01:07 IST

४८० व्यक्तिंमागे एक पोलीस; गुन्हेगारी वाढली

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत आहे. यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढत असून, गुन्हेगारांनाही मोकळीक मिळत आहे. त्यामुळे येत्या पोलीस भरतीत नवी मुंबईसाठी किती जागा भरल्या जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातली गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.नवी मुंबईसह पनवेल व उरण क्षेत्राची मिळून सुमारे २२ लाखांची लोकसंख्या पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात आहे. या लोकसंख्येसाठी पोलीसबळ मात्र केवळ ४ हजार ८०४ इतके आहे. त्यामधील सुमारे ४५० अधिकारी वगळता उर्वरित ४५०० कर्मचाऱ्यांवर संपूर्ण आयुक्तालय क्षेत्राच्या सुमारे ९५३ चौ. किमी. क्षेत्रफळाच्या बंदोबस्ताची जबाबदारी आहे. त्यात १४४ चौ. कि. मी. चा सागरी किनारा असून, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सागरी सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आहे.गुन्हेगारीचे बदलते स्वरूपनवी मुंबईच्या होत असलेल्या विकासामुळे इथले गुन्हेगारीचे स्वरूपदेखील बदलत चालले आहे. यामुळे शहराबाहेरील गुन्हेगार शहरात सोनसाखळी, वाहनचोरी, दरोडे करून बाहेर पळ काढत आहेत, तर इंटरनेटच्या माध्यमातून होणारी सायबर गुन्हेगारीदेखील वाढत चालली आहे. या गुन्ह्यांच्या तपासाचे आव्हान पोलिसांपुढे असून बदलत्या गुन्हेगारीप्रमाणे पोलिसांनादेखील अद्ययावत होण्याची काळाची गरज आहे.पोलिसांवर ताणनवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्र हे शहरी व ग्रामीण अशा दोन भागात विभागले आहे. शिवाय शहरातील मोठमोठे प्रकल्प व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यादेखील नवी मुंबईत आहेत. तर सुमारे १४४ चौ. कि.मी. क्षेत्रफळाचा सागरी किनारा आहे. ही ठिकाणे गुन्हेगारांकडून लक्ष होऊ नयेत, यासाठी पोलिसांना सतत सतर्क रहावे लागत आहे. त्याशिवाय नियमित ठरलेली कामे, घडलेल्या गुन्ह्यांचा तपास याचाही भार पोलिसांवर पडत आहे. त्यामुळे उपलब्ध पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून, यातूनच अनेकांची प्रकृतीदेखील खालावत आहे.नवी मुंबईसाठी अधिक पोलीस बळाची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात यापूर्वीच रिक्त असलेल्या सुमारे २५० जागांची माहिती शासनाला दिलेली आहे. येत्या पोलीस भरतीमध्ये आवश्यक जागा भरून निघण्याची शक्यता आहे.- अभिजित शिवथरे, पोलीस उपायुक्त- मुख्यालय