शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीऐवजी सौभाग्यवतींना संधी

By admin | Updated: May 9, 2017 01:32 IST

पनवेल महानगरपालिकेत पन्नास टक्के जागा महिलांकरिता राखीव आहेत. इच्छुक उमेदवारांमध्ये पुरुषांची संख्या जास्त होती.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महानगरपालिकेत पन्नास टक्के जागा महिलांकरिता राखीव आहेत. इच्छुक उमेदवारांमध्ये पुरुषांची संख्या जास्त होती. त्यामुळे काहींना तिकीट न देता सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. पनवेल महापालिकेतील ७८ जागांपैकी ३९ जागांवर महिला उमेदवार द्याव्या लागणार आहेत. ऐनवेळी नवीन चेहरा दिला तर मतदारांना अपील होईल का, त्याचा नेमका काय परिणाम होईल याबाबतही प्रमुख पक्षांनी विचारमंथन केले. प्रभाग क्र मांक १७ मध्ये विजय म्हात्रे यांच्या पत्नीला शेकापकडून उमेदवारीमिळाली. १६ मध्ये प्रभाकर कांबळे आणि किशोर चौतमोल यांना आपल्या सौभाग्यवतीला अनुक्र मे शेकाप आणि भाजपाकडून उमेदवारी घ्यावी लागली. प्रभाग १८ चा विचार केला तर संतोष उरणकर यांना आपल्या होम मिनिस्टर भारती यांना भाजपाकडून उमेदवारी घ्यावी लागली. याच ठिकाणी डॉ. विलास मोहकर यांच्या पत्नी सुरेखा मोहकर शेकापकडून निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्र मांक १५ मध्ये श्रीहरी मिसाळ यांना उमेदवारी हवी होती, परंतु सर्वसाधारण एकच जागा असल्याने सविता मिसाळ यांना शिवसेनेकडून सर्वसाधारण महिला राखीव असलेल्या जागेवर तिकीट घेतले आहे. गणेश पाटील यांनी याच प्रभागातून बंडाचे निशान फडकविण्याचा इशारा दिला होता, परंतु शेवटी त्यांनी पत्नी कुसुम पाटील यांना निवडणुकीत उभे केले आहे. प्रभाग ८ मध्ये बबन बरगजे यांनी भाजपाकडून उमेदवारीमागितली होती, परंतु पक्षाने त्यांची पत्नी बायजा यांना संधी दिली आहे. याच प्रभागातून रोडपाली कळंबोली विकास आघाडीतून सचिन कुंभार इच्छुक होते, परंतु आरक्षण प्रतिकूल असल्याने त्यांच्या पत्नी ललिता कुंभार यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय अ‍ॅड. धर्मनाथ गोंधळी यांना उमेदवारी हवी होती, परंतु आघाडीने त्यांच्या होममिनिस्टर शोभना यांना संधी दिली आहे. प्रभाग सातमध्ये भाजपाकडून रवींद्र पाटील यांच्या पत्नीला कमळाच्या चिन्हावर लढण्याकरिता पक्षाने ए.बी. फॉर्म दिला. खारघरमधून शेकापचे अजित अडसुळे यांच्या पत्नी उषा यांना प्रभाग ६मधून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या शेकापकडून महापौरपदाच्या उमेदवार मानल्या जातात. भाजपाचे स्थानिक नेते किरण पाटील यांच्या पत्नी नेत्रा यांना प्रभाग ४मधून संधी दिली गेली आहे. प्रभाग १२ येथे शेकापचे राजेश म्हात्रे आणि सखाराम पाटील यांच्या गृहमंत्री अनुक्र मे सुवर्णा आणि ललिता यांच्या हातात कपबशी देण्यात आली आहे. प्रभाग नऊमधून माजी सभापती चंद्रकला शेळके यांना संधी देण्यात आली आहे. त्या शेकापचे नेते शशिकांत शेळके यांच्या पत्नी आहेत. याच पक्षाचे प्रकाश म्हात्रे यांच्या सौभाग्यवती माजी जिल्हा परिषद सदस्य प्रज्योती म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.