शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या ताफ्यात दहा पीसीआर व्हॅन दाखल

By admin | Updated: May 2, 2017 03:28 IST

संकटसमयी नागरिकांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दहा नव्या पीसीआर व्हॅन कार्यरत

नवी मुंबई : संकटसमयी नागरिकांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दहा नव्या पीसीआर व्हॅन कार्यरत करण्यात आल्या आहेत. या व्हॅनचे लोकार्पण सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. या व्हॅन शहराअंतर्गत व महामार्गावर गस्तीसाठी वापरल्या जाणार आहेत.नागरिकांना संकटसमयी पोलिसांकडून मिळणाऱ्या मदतीचा प्रतिसाद कालावधी कमी करण्याचा प्रयत्न नवी मुंबई पोलिसांकडून होत आहे. त्यानुसार अधिकाधिक कमी वेळेत नागरिकांपर्यंत कसे पोहोचता येईल याकरिता फिरती पथके तयार करण्यात आलेली आहेत; परंतु सद्यस्थितीला फिरत्या पथकांकडे चांगल्या वाहनांची कमतरता असल्यामुळे संकटात असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दहा नवीन पीसीआर व्हॅन दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांचे वाटप सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कळंबोली मुख्यालयाच्या ठिकाणी करण्यात आले. महिलांच्या सुरक्षेसाठी परिमंडळ १ व २मध्ये प्रत्येकी एक व्हॅन देण्यात आली आहे. एखादी महिला संकटात असल्याची माहिती कंट्रोल रूमवर मिळाल्यास ती माहिती या पथकाला देऊन महिलेच्या मदतीसाठी तत्काळ पाठवले जाणार आहे. तर हायवे पेट्रोलिंगसाठी एक व्हॅन कार्यरत करण्यात आली आहे. ही व्हॅन आयुक्तालय हद्दीत वाशी खाडीपुल ते गोवा महामार्गादरम्यान सशस्त्र गस्त घालणार आहे. यामुळे अपघातग्रस्तांना तत्काळ पोलिसांची मदत मिळणार असून गुन्हा करून शहराबाहेर पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगारांनाही अटकाव घालणे शक्य होणार आहे. त्याशिवाय परिमंडळ-१मध्ये पोलीस ठाणे हद्दीत गस्तीसाठी तीन व परिमंडळ-२ मध्ये पोलीस ठाणे हद्दीत चार अल्फा मोबाइल व्हॅन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक पोलीस निरीक्षक अथवा उपनिरीक्षक व चार कर्मचारी असणार आहेत. (प्रतिनिधी)शहरात गस्तीसाठी दहा पीसीआर मोबाइल व्हॅन कार्यरत करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे पोलीस ठाणे अंतर्गत व आयुक्तालय कार्यक्षेत्रातल्या महामार्गावर गस्त घातली जाणार आहे. तर महिलांच्या मदतीसाठी दोन्ही परिमंडळामध्ये प्रत्येकी एक विशेष महिला पथक असलेली महिला सुरक्षा पेट्रोलिंग व्हॅन कार्यरत करण्यात आली आहे.- डॉ. सुधाकर पठारे, पोलीस मुख्यालय उपआयुक्त