शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी समिती देणार दोन आठवड्यांत अहवाल; वादग्रस्त चाचण्यांची पडताळणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 01:56 IST

चाचणी घोटाळा प्रकरण : दोन आठवड्यांत हा अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालानंतरच कोरोना चाचणीमध्ये घोटाळा झाला की तांत्रिक चुका होत्या? हे स्पष्ट होणार आहे.

नवी मुंबई : कोरोना चाचण्यांमध्ये घोटाळा झाला की नाही? हे तपासण्यासाठी महानगरपालिकेने चौकशी समिती नियुक्त केली आहे. दोन आठवड्यांत ही समिती अहवाल देणार? आहे. समितीने वादग्रस्त चाचण्यांची पडताळणी सुरू केली असून, समिती काय अहवाल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अँटिजेन चाचण्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. काही वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तींचा अहवालही निगेटिव्ह आल्याचे निदर्शनास आणून दिले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही मनपा आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. यानंतर आयुक्तांनी अहवाल नोंदणीचे काम करणारे डॉ. सचिन नेमाणे यांना निलंबित करून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. या समितीने कोरोना चाचण्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. याविषयी आवश्यक माहिती संबंधित विभागाकडून घेऊन त्यांची पडताळणी सुरू केली आहे.

दोन आठवड्यांत हा अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालानंतरच कोरोना चाचणीमध्ये घोटाळा झाला की तांत्रिक चुका होत्या? हे स्पष्ट होणार आहे. महानगरपालिका प्रशासन १३ मार्चपासून कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यातही यश मिळविले आहे. परंतु घोटाळ्याच्या आरोपामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.

आयुक्तांच्या बदलीचीही चर्चाघोटाळ्याच्या आरोपामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. यामुळे शहरात याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली केली जाणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. याविषयी काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता या अफवा असल्याचे सांगण्यात आले असून चौकशीचा अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल, असेही स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या