शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील गतिमंद मुलींचा अटकेपार झेंडा

By admin | Updated: August 6, 2015 00:35 IST

एस स्पेशल आॅलिम्पिकमध्ये वर्ल्ड समर गेम्समध्ये खारघर येथे राहणाऱ्या गतिमंद २१ वर्षीय स्नेहा वर्मा हिने सुवर्णपदक मिळवून भारताचे नाव उंचावले

नवी मुंबई : यूएस स्पेशल आॅलिम्पिकमध्ये वर्ल्ड समर गेम्समध्ये खारघर येथे राहणाऱ्या गतिमंद २१ वर्षीय स्नेहा वर्मा हिने सुवर्णपदक मिळवून भारताचे नाव उंचावले. २७ जुलै रोजी झालेल्या लॉस एन्जेलिस, अमेरिका येथे झालेल्या या आॅलिम्पिक्समध्ये ४० मी. फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये स्नेहा वर्मासारख्या विशेष मुलीने मिळविलेल्या यशाने शहरात कौतुकाचा वर्षाव झाला. या स्पर्धेत स्नेहाने भारताचे प्रतिनिधित्व करून भारताचा तिरंगा परदेशी फडकविला. स्नेहा वर्मा ही सीबीडीमधील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थिनी असून वयाच्या दहाव्या वर्षापासून ती पोहण्याचे प्रशिक्षण घेत असून आतापर्यंत तिने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरावर पोहण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. २०१३ साली कर्नाटकात झालेल्या राष्ट्रीय आॅलिम्पिक स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले होते. पोहण्याच्या सरावाबरोबरच ती नृत्याचेही प्रशिक्षण घेत असून शहरातील अनेक नृत्यस्पर्धेतही तिने भरपूर बक्षिसे मिळविली आहेत.पनवेलच्या दिशा मारू या विद्यार्थिनीनेही २५ मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत चांदीचे पदक मिळविले. दिशा सीबीडीतील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थिनी असून वयाच्या पाचव्या वर्षापासून पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे. यावेळी मुख्याध्यापिका सुकन्या वैंकटरमण यांनी दोघींचे कौतुक करून अपंगत्व असूनही सर्वसामान्य मुलांपेक्षा मुलींची कामगिरी आणि त्यांना मिळालेले यश नक्कीच वाखणण्याजोगे असल्याचे सांगितले.