शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत नागरिकांसाठी मोफत फिरता दवाखाना, मंदा म्हात्रे यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 00:30 IST

mobile hospital : मंदा  म्हात्रे यांच्या पुढाकाराने तथा महानगरपालिका व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त सहकार्यातून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

नवी मुंबई : सणासुदीच्या उत्साहात कोरोना पुन्हा तोंड वर काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नवी मुंबईकरांना तातडीचे उपचार मिळावेत, या दृष्टीने बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात मोफत फिरता दवाखाना सुरू होणार आहे.मंदा  म्हात्रे यांच्या पुढाकाराने तथा महानगरपालिका व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त सहकार्यातून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. दिवाळीच्या उत्सवातील उत्साहातून कोरोना पुन्हा डोके वर काढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी, या उद्देशाने मंदा म्हात्रे यांनी मतदार संघातील प्रत्येक प्रभागात मोफत फिरता दवाखाना सुरू करण्याची योजना आखली आहे. प्रथमोपचार, मोफत तपासणी, मोफत बी.पी. व मधुमेह तपासणी करण्यात येणार असून, गरजेनुसार  मोफत औषधे दिली जाणार आहेत.बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांना याचा लाभ घेता यावा, याकरिता सर्व ५१ प्रभागांत हा मोफत फिरता दवाखाना संपूर्ण १ महिन्याकरिता उपलब्ध करण्यात येणार आहे. मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२० पासून या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. सकाळी ८ ते दुपारी १ व दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असे दिवसातून २ टप्प्यांत हा फिरता दवाखाना नागरिकांसाठी सुरू राहील, अशी माहिती मंदा म्हात्रे यांनी दिली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई