शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

भावे नाट्यगृहातील कार्यक्रमांची माहिती मिळणार डिजिटल बोर्डवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:31 IST

महासभेत प्रस्तावाला मंजुरी; प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी निर्णय

नवी मुंबई : मराठी नाटकास सुमारे १५० वर्षांची परंपरा व सांस्कृतिक वारसा आहे. चित्रपट, टीव्ही यासारख्या उपकरणांमुळे दर्जेदार नाटक असूनदेखील प्रेक्षकवर्ग कमी आकर्षिला जात आहे. जाहिरातीच्या माध्यमातून प्रेक्षकवर्ग आकर्षित करण्यासाठी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहातील कार्यक्रमांची माहिती आता डिजिटल बोर्डवर प्रसिद्ध होणार आहे. यासाठी बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर कंत्राट देण्यात येणार असून सदर प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळाली आहे.नवी मुंबई शहराला २१ व्या शतकातील शहर म्हणून संबोधले जाते. महापालिकेच्या माध्यमातून शहराला साजेसे विविध प्रकल्प राबविण्यात आले असून नागरिकांना विविध अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरविल्या जात आहेत. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणाऱ्या नाट्यप्रयोगाच्या अथवा कार्यक्रमांच्या जाहिरातीकरिता पारंपरिक पद्धतीनुसार सुवाच्च अक्षरामध्ये तज्ज्ञ ड्रॉइंग मास्टरमार्फत ब्लॅक बोर्डवर रोजच्या रोज जाहिरात लिहिल्या जात आहेत. डिजिटल जाहिरातीच्या माध्यमातून नाटकाच्या प्रयोगांना प्रेक्षकवर्ग आकर्षित करण्यासाठी डिजिटल बोर्डवर जाहिरात केली जाणार आहे.डिजिटल इलेक्ट्रिक बोर्डचा खर्च आणि देखभाल दुरु स्ती खर्च पाहता डिजिटल बोर्ड बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा तत्त्वावर देण्यात येणार असून यामुळे महापालिकेचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे.भावे नाट्यगृहातील नाटक अथवा कार्यक्रमांच्या जाहिरातीसाठी संरक्षक भिंतीवर २८ बाय सहा आकाराचा डिजिटल इलेक्ट्रिक बोर्ड बसवून त्यापैकी १० बाय ६ आकाराच्या डिजिटल इलेक्ट्रिक बोर्डवर नाट्यगृहामध्ये सादर होणारे नाट्यप्रयोग, कार्यक्र म अथवा महापालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात येणाºया सूचना, योजनांबाबत माहिती अथवा कार्यक्रमांच्या आयोजनांबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उर्वरित १८ बाय ६ या जागेवर संबंधित संस्थेमार्फत खासगी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. डिजिटल बोर्ड बसविण्याचा खर्च, बसविण्याची कार्यवाही, देखभाल दुरु स्ती खर्च, विद्युत देयक खर्च, जाहिरातीस प्रसिद्धी देण्याकरिता आॅपरेटर खर्च संबंधित संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याने महापालिकेचा अतिरिक्त खर्चदेखील टळणार आहे. तसेच यामुळे नागरिकांना भावे नाट्यगृहात सादर होणारे नाट्यप्रयोग आणि कार्यक्रमांची माहिती अत्याधुनिक डिजिटल इलेक्ट्रिक बोर्डवर मिळणार आहे.