शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत तबेल्यांचे पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 02:39 IST

यादवनगरमध्ये परप्रांतीयांनी एमआयडीसीची जागा बळकावून तेथे अनधिकृतपणे तबेले सुरू केले आहेत. कायदा धाब्यावर बसवून जवळपास २० तबेल्यांमध्ये ७०० ते ८०० जनावरे पाळण्यात आली

नामदेव मोरे, नवी मुंबई यादवनगरमध्ये परप्रांतीयांनी एमआयडीसीची जागा बळकावून तेथे अनधिकृतपणे तबेले सुरू केले आहेत. कायदा धाब्यावर बसवून जवळपास २० तबेल्यांमध्ये ७०० ते ८०० जनावरे पाळण्यात आली आहेत. स्वच्छतेचेही निकष पाळले जात नसल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, राजकीय वरदहस्त असल्यामुळेच शासकीय यंत्रणा संबंधितांवर काहीच कारवाई करीत नाहीत. महापालिकेच्या पोटनिवडणुकीनिमित्त यादवनगरमधील अनधिकृत साम्राज्य शहरवासीयांना पाहावयास मिळाले आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर बुलडोजर चालविला जात असताना उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेल्या परप्रांतीयांनी बिनधास्तपणे जवळपास ५० एकर जमिनीवर वसाहत उभी केली आहे. प्रकल्पग्रस्तांनी एमआयडीसीला उद्योग उभारणीसाठी दिलेल्या जमिनीवर परप्रांतीयांनी झोपड्या बांधल्या आहेत. फक्त झोपड्या बांधून थांबलेले नसून, या जागेचा मोठ्या प्रमाणात व्यवसायासाठी वापर सुरू केला आहे. यादवनगरमध्ये एकाच प्रभागामध्ये जवळपास २० तबेले सुरू केले आहेत. महाराष्ट्र नागरी क्षेत्रामधील गुरे पाळणे आणि त्यांची ने-आण करणे नियंत्रण अधिनियम १९७६ मधील नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. शहरांमध्ये तबेला सुरू करण्यासाठी व दूध व्यवसायासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक असते. ही परवानगी देताना त्या विभागातील जनावरांची संख्या, गुरे पाळणे प्रस्तावित केलेल्या क्षेत्राची योग्यता, जनावरांना पिण्यासाठी, धुण्यासाठी आणि साफसफाईसाठी तबेल्यामध्ये योग्य पाणीपुरवठ्याची व्यवस्था व स्वच्छतेचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. परंतु यामधील एकाही नियमाचे पालन यादवनगरमध्ये केले जात नाही. एमआयडीसीच्या जागेवर स्वत:ची मालकी असल्याप्रमाणेच तबेलाचालक वागत आहेत. नागरी वस्तीमध्येच तबेले असल्यामुळे या परिसरातील १० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जनावरांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात नाही. त्यांनी अधिकृत शासकीय डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी होते का, याविषयीही शंका उपस्थित केली जात आहे. जनावरांना देण्यात येणारा चारा व पाणी योग्य आहे का, याचीही तपासणी केलेली नाही. येथे अनधिकृतपणे बोरअवेल काढून त्याचे पाणी तबेल्यांसाठी वापरले आहे. परंतु हे पाणी पिण्यायोग्य आहे का, हे तपासलेले नाही. दूध विक्री व व्यवसायासाठी अधिकृत परवाना घेतलेला नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाचा व महापालिकेचाही परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु येथील परप्रांतीय व्यावसायिक नियम पायदळी तुडवत आहेत. > प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी परप्रांतीयांच्या घशातशासनाने नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या १०० टक्के जमिनी संपादित करून तेथे ठाणे, बेलापूर औद्योगिक वसाहत व नवी मुंबई शहर वसविले आहे. एमआयडीसी व सिडकोने अद्याप प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. गरजेपोटी बांधलेली घरे तोडली जात आहेत. प्रकल्पग्रस्तांना भूमाफिया ठरवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न केले जात असून दुसरीकडे उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेल्या परप्रांतीयांनी करोडो रुपयांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर काहीच कारवाई केली जात नाही.