शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

सलग ७९२ तास गायनाचा विश्वविक्रम भारताच्या नावावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 14:42 IST

विराग मधुमालती ग्रुपच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन १५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबरदरम्यान करण्यात आले आहे.

- वैभव गायकर

पनवेल : राष्ट्रीय एकात्मतेसाठी बेटी बचाव बेटी पढाव, स्टॉप ग्लोबल वार्मिंग, कैपस विथ हेल्मेट, सेव्ह वॉटर,रक्त दान या सामाजिक विषयांच्या प्रचार व प्रसारासाठी खारघर शहरातील लिटलवर्ल्ड मॉलमध्ये हा उपक्रम साकारला जात आहे. सलग गायनाच्या चीनच्या ७९२ तासांचा विक्रम मोडीत काढून भारताच्या नावावर या विश्वविक्रमाची नोंद १८ डिसेंबरला दुपारी १ वाजून 21 मिनिटांनी झाली. या विक्रमाची नोंद गिनीज बुक वर्ल्ड रोकॉर्ड मध्ये करण्यात आली. सुमारे ८०० पेक्षा जास्त गायकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.

विराग मधुमालती ग्रुपच्या माध्यमातुन या उपक्रमाचे आयोजन १५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबरदरम्यान करण्यात आले आहे. या उपक्रमात देशभरातील विविध कानाकोप-यातील गायक, संगीतप्रेमी सहभागी होत आहेत. यामध्ये देशभरातील विविध राज्यातील गायकांनी सहभाग घेतला. यामध्ये दिल्ली, केरळ, चेन्नई, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, ओरिसा, पुणे, गुजरात,राजस्थान आदींसह वेगवगेळ्या ठिकाणच्या संगीतप्रेमींनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे.

या उपक्रमात ११०० पेक्षा जास्त गायक सहभागी होणार आहेत. यामध्ये मराठी, हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांचा संगीत गितांचा सहभाग आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आजतागायत सलग ७९२ तास गायनाच्या विक्रमाची नोंद चीन देशाच्या नावावर होता. या उपक्रमात सहभागी झालेल्या गायकावर नजर ठेवण्यासाठी ४ कॅमेरे तसेच प्रत्येक सेकंदाची नोंद करण्यासाठी निरीक्षक याठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. 

या उपक्रमाअंतर्गत  बेटी बचाव बेटी पढाव, स्टॉप ग्लोबल वार्मिंग, कैपस विथ हेल्मेट, सेव्ह वॉटर, रक्त दान यासंदर्भात देखील जनजागृती केली जात आहे. त्यानुसार मंचावर या विषयावरील जनजागृतीचे पोस्टर लावले जात आहेत. या उपक्रमाचे आयोजक विराग मधुमालती यांच्या नावावर आजतागायत सुमारे चार जागतिक विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. हे विक्रम राष्ट्रीय एकात्मता व नेत्रदान जनजागृतीसाठी समर्पित करण्यात आले आहेत. या उपक्रमाला आपला पाठिंबा देण्यासाठी विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी याठिकाणी भेट देत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई