शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे इंडियन स्वच्छता लीग रद्द

By नामदेव मोरे | Updated: September 16, 2022 16:37 IST

५० हजार तरूण होणार होते सहभागी : २५० पेक्षा जास्त शाळांना दिले होते आमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुसळधार पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने १७ सप्टेंबरला आयोजीत केलेली इंडियन स्वच्छता लीग रद्द केली आहे. नेरूळमधील गणपतशेठ तांडेल मैदानात १७ सप्टेंबरला हा उपक्रम राबविण्यात येणार होता. यामध्ये २५० पेक्षा जास्त शाळांमधील ५० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार हाेते.

नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवस अतीवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत होणारे कार्यक्रम पुढे ढकललले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शनिवारी नेरूळ सेक्टर २६ मधील गणपतशेठ तांडेल मैदानात सकाळी ८ ते ११ दरम्यान विशेष कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमात शहरातील २५० पेक्षा जास्त शाळांमधील ५० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित राहून स्वच्छतेविषयी जनजागृती करणार होते. विद्यार्थ्यांची वेशभुषा, घोषवाक्ये व इतर कल्पक प्रदर्शनाप्रमाणे त्यांना पारितोषीके साजरी केली जाणार होती. इंडियन स्वच्छता लीगमधील कार्यक्रमांचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. या लीगसाठी mygov पोर्टलवर करावयाचे रजिस्ट्रेशन सुरू असून जास्तीत जास्त नागरिकांनी रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.