शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय ड्युबॉल स्पर्धेत भारताला सुवर्ण

By admin | Updated: February 7, 2017 04:12 IST

नेपाळ ड्युबॉल फेडरेशनच्या वतीने नुकतेच इंडो-नेपाळ इंटरनॅशल ड्युबॉल सिरीज फॉर मेन अ‍ॅण्ड वूमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

नवी मुंबई : नेपाळ ड्युबॉल फेडरेशनच्या वतीने नुकतेच इंडो-नेपाळ इंटरनॅशल ड्युबॉल सिरीज फॉर मेन अ‍ॅण्ड वूमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात भारतीय संघ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. संघात नेरूळमधील सेंट झेवियर्स शाळेतील सात खेळाडूंचा सहभाग होता. पोखरा, नेपाळ येथे झालेल्या या स्पर्धेत चुरशीची लढत देत मुलींच्या संघाने खुल्या गटात बाजी मारली.ड्युबॉलमध्ये ७ खेळाडूंचा सहभाग असतो. यात सरावाबरोबरच प्रचंड स्टॅमिनाची गरज असते, अशी माहिती प्रशिक्षक जयदीप राजपूत यांनी दिली. नेरूळमधील सेंट झेविअर्स शाळेतील विद्यार्थ्यांना या खेळाचे विशेष प्रशिक्षण दिले जात त्यांच्याकडून नियमित सरावही करून घेतला जातो. ड्युबॉल हा खेळ तीन वर्षांपूर्वीपासून खेळला जात असून अजूनही नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना या खेळाबाबत फारशी माहिती नाही. मात्र आगामी काळात हा खेळ प्रत्येक मैदानावर खेळला जाईल, इतकेच नव्हे राज्यातही या खेळाला विशेष महत्त्व प्राप्त होईल, असे राजपूत यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय ड्युबॉल फेडरेशनचे सदस्य फिरोज खान यांनीही झेवियर्स शाळेच्या खेळाडूंचे कौतुक करत खेळाविषयी मार्गदर्शन केले. शाळेतील खेळाडूंना स्पर्धेनिमित्त बाहेरगावी जावे लागत असून त्या दरम्यानचा अभ्यासक्र म भरून काढण्याकरिता शाळेचे विशेष योगदान असल्याची प्रतिक्रि या पालक सतीश पवार यांनी दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा अंदानसरे स्वत: विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देत असून खेळाडूंकरिता विशेष शिकवणीचे आयोजन केले जाते. भारतीय संघात नेरूळमधील झेविअर्स शाळेतील खेळाडू हेतीशा पवार, स्मृती सिंग, धन्या पुजारी, नूपुर अमकर, श्रावणी माने, नाहेल शेख आणि मुलांच्या गटात मंदार अपरदेशी यांचा सहभाग होता. शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.