शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

पनवेल तालुक्यात महिलांची संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 07:00 IST

पनवेल परिसरात महिलांचे प्रमाण कमीच असल्याचे मागील जनगणना आणि मतदार नोंदणी आकडेवारीवरून उघड झाले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत मुलीचा जन्मदर वाढत आहे, ही बाब अतिशय समाधानकारक असल्याचे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेली आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली - शहरीबहुल समजल्या जाणाºया पनवेल परिसरात महिलांचे प्रमाण कमीच असल्याचे मागील जनगणना आणि मतदार नोंदणी आकडेवारीवरून उघड झाले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत मुलीचा जन्मदर वाढत आहे, ही बाब अतिशय समाधानकारक असल्याचे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेली आहे. अकरा महिन्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प-२ मध्ये नोंद झालेल्या आकडेवारीचा विचार केला तर मुलांच्या तुलनेत मुलींचा आकडा ३८ने जास्त आहे.तीन वर्षांपूर्वी सोनोग्राफी मशिनच्या नोंदणीचे नूतनीकरण न करणे, माहिती व्यवस्थित न ठेवणे त्यामुळे दोन वैद्यकीय व्यावसायिकांना पनवेल न्यायालयाने शिक्षाही दिली. मध्यंतरी काही सामाजिक संस्थांनी लेक लाडकी अभियान राबवून जनजागृती केली. २०११ मध्ये या परिसराची जनगणना झाली, त्याचबरोबर नव्याने मतदार नोंदणीही झाली. त्या आकडेवारीहून पनवेल परिसरातील महिलांचे प्रमाण एक हजार पुरुषांमागे ९०० च्याही खाली गेले होते. २००८ मध्ये झालेल्या एका पाहणीत हे प्रमाण ९४१ होते. त्यानंतर ७६ ने खाली घसरून ८६५वर आले होते. ही बाब अतिशय चिंतेची असल्याने सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. गेल्या अकरा महिन्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प-२ मध्ये नोंद झालेल्याआकडेवारीचा विचार केला तर मुलांच्या तुलनेत मुलींचा आकडा ३८ ने जास्त आहे.प्रकल्प अधिकारी आर.एन. सांबरे, विस्तार अधिकारी संतोष ठोंबरे, प्रकल्प पर्यवेक्षिका जे.एम. गांधी, पी.पी.कदम, ए.ए.दाते, व्ही.एन.तांडेल, दीपा मटकर यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा वर्कर यांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहचले. अंगणवाडी सेविका आणि गरोदर माता यांचा जास्त संपर्कयेत असल्याने त्यांच्या माध्यमातून स्त्री जन्माचे महत्त्व पटवून दिले जात आहे. केवळ मातेलाच नाही तर घरातील सर्वांना मुलींचे स्वागत करण्यास प्रवृत्त केले. त्याचबरोबर प्रबोधन, जनजागृती आणि महिला मेळाव्याचे आयोजन सुद्धा करण्यात येते. त्याचा परिणाम पनवेल तालुक्यातील बहुतांशी भागात जाणवू लागला आहे.प्रकल्प-२च्या अखत्यारीत तालुक्याचा बराचसा भाग येतो त्याचबरोबर त्यामध्ये आदिवासी वाड्या आणि पाड्यांचा समावेश आहे.१५ ते ४५ या वयोगटातील लाभार्थ्यांबरोबर आमचा थेट संबंध असतो. अंगणवाडी सेविकांचे गृहभेटीत या महिलांबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण होतात. त्या थेट चुलीपर्यंत पोहचतात त्यामुळे मुलींच्या जन्माबाबत त्यांना पटवून देता येते त्यामुळे हळूहळू मानसिकता बदलत जाते.- जे.एम.गांधी, पर्यवेक्षिकाया भागात विविध विकास प्रकल्प आले असून, नागरीकरण वाढत आहे. पायाभूत सुविधांचा विकास होत असताना दळणवळणाची साधनेही वाढली आहेत. त्यामुळे पनवेल आणि मुंबईचे अंतरही कमी झाले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे समाजाच्या मानसिकतेत बदल होऊन दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या वाढत चालली आहे.- संतोष ठोंबरे,एकात्मिक बालविकास सेवा योजना,प्रकल्प-२जन्मदराची २०१७-१८ मधील आकडेवारीमहिना मुले मुलीएप्रिल ८७ ७९मे ५७ ६३जून ७२ ९८जुलै ७८ ७९आॅगस्ट ५६ ६६सप्टेंबर ६३ ७५आॅक्टोबर ४४ ५०नोव्हेंबर ८८ ८४डिसेंबर ७९ ६९जानेवारी ७० ७१फेब्रुवारी ३७ ४५एकूण ७३१ ७६९

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८