शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

बाप्पाच्या मिरवणुकींत ढोल-ताशांची वाढतेय क्रेझ

By admin | Updated: September 13, 2016 02:45 IST

ध्या डॉल्बी, साऊंड सिस्टीम संस्कृतिला बाजूला सारत ढोल-ताशा पथकांची वाजंत्रीचा नवा फॅड तरूणाईमध्ये आहे. पुणे-मुंबई अशा कसलेल्या निष्णात ढोल-ताशे पथकाचे संचलनाची दृश्ये

पेण : सध्या डॉल्बी, साऊंड सिस्टीम संस्कृतिला बाजूला सारत ढोल-ताशा पथकांची वाजंत्रीचा नवा फॅड तरूणाईमध्ये आहे. पुणे-मुंबई अशा कसलेल्या निष्णात ढोल-ताशे पथकाचे संचलनाची दृश्ये वाहिन्यांवर गणपती आगमनासह विसर्जन मिरवणुकामध्ये पहावयास मिळतात. महानगरांचे हे ढोल-ताशे पथकाचे फॅड शहराच्या वेशीवर पोहचून चांगलेच बाळसं धरू लागले आहे. लयबध्द तालावर एकाच रांगेत एकसारख्या पेहरावातील ढोल-ताशे पथकात आपलीच मुले जेंव्हा उत्साहाने वाजंत्री वाजवितात तेंव्हा त्याचा मनमुराद आनंद पालकांसह शहरातील मित्रपरिवार घेतात. पेण शहरात ढोल-ताशा पथकाचं सादरीकरण येत्या साखरचौथ गणरायांच्या आगमनाप्रसंगी होणार असून त्या ढोल-ताशे पथकाचे १०० सभासद यासाठी जीवापाड मेहनत घेऊन सराव करत आहेत.गणेशोत्सवात ढोल-ताशा पथक असणे ही सध्या नवी ओळख बनत आहे. सणवारात चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा, ग्रामदैवतांचे उत्सव, नवरात्री, गणेशोत्सव तथा राष्ट्रीय सणाच्या रॅली प्रसंगी या पथकाची उणिव भासू नये यासाठी पेण गणेश मूर्तीकारांच्या कासार आळीतील महाकाली हॉल व मंदिरासमोरील जागेत सध्या ढोल-ताशे पथकाचा सराव सुरू आहे. महिला ४० व पुरूष ७० असे मिळून ११० ते १२५ च्या घरात सदस्य नोंदणी झाली असून ड्रेसकोड, वाजंत्रींची साधने, ४० ढोल, १० ताशे व इतर अनुरूप वाजंत्री साहित्यांनी सज्ज असलेले ढोल पथक साखर चौथ गणरायांच्या आगमनापासून पेणमध्ये कार्यरत होणार आहे.पारंपरिकता जपून कमरेला ढोल-ताशे बांधणे, वाद्यांची ने-आण करण्याची सर्व कामे कशी करावी, मिरवणुकांमध्ये शांततापूर्ण वातावरण कसे ठेवावे हे प्रशिक्षण ही मुलं घेत आहेत असे प्रकल्प मार्गदर्शक धनश्री सचीत समेळ या दाम्पत्यांनी सांगितले.