शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
2
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
3
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
5
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
6
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
7
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
8
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
9
Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक 
10
विवाहित महिला पुतण्याच्या प्रेमात पडली, लिव्ह-इनमध्ये राहिली; वाद सुरू होताच आयुष्य संपवलं! आता पती म्हणाला...
11
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
12
Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय
13
परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."
14
LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स
15
थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
16
Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!
17
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
18
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
19
"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
20
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?

अर्थसंकल्पामध्ये ३०० कोटी रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:41 IST

४,१५० कोटींच्या खर्चास स्थायी समितीची मंजुरी; अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे

नवी मुंबई : आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीमध्ये चर्चा करण्यात आली. स्थायी समितीने मूळ अंदाजपत्रकामध्ये ३०० कोटी रुपयांची वाढ करून ४,१५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला जाणार असून, तेथे किती वाढ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्थायी समितीमध्ये १८ फेब्रुवारीला २०२०-२१ साठीचे ३,८५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. स्थायी समितीमध्ये बुधवारी या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली. आयुक्तांनी मालमत्ताकर विभागाला ६३० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. स्थायी समितीने त्यामध्ये १५० कोटींची वाढ करून ७८० कोटी रुपये केले आहे. नगर रचना विभागाचे उद्दिष्ट १२५ कोटींवरून २२५ कोटी व स्थानिक संस्था कराचे उद्दिष्ट १,२५० कोटींवरून १,३०० कोटी रुपये करण्यात आले आहे. आयुक्तांनी परिवहनसाठी ९५ कोटी रुपये अनुदान मंजूर केले होते. स्थायी समितीने त्यामध्ये तब्बल ४२ कोटी ७५ लाख रुपयांची वाढ केली असून, १३७ कोटी ७५ लाख रुपये केले आहे. परिवहन डेपोसाठी जमीन विकत घेण्यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उघड्या नाल्यांचे काम करण्यासाठी मूळ अंदाजपत्रकामध्ये १२ कोटी ६५ लाख रुपयांची तरतूद केली होती. त्यामध्ये वाढ करून तरतूद १५० कोटी रुपये करण्यात आली आहे.सदस्यांची अनुपस्थितीमहापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी बुधवारी स्थायी समिती सभा बोलाविण्यात आली होती. सकाळी ११ वाजता सुरू होणारी सभा तब्बल दीड तास उशिराने सुरू झाली. या सभेला सभापतींसह नऊ सदस्य उपस्थित होते. दुपारी २:३० वाजता जेवणासाठी एक तासाची सुट्टी करण्यात आली; परंतु सदस्यांची संख्या कमी झाल्याने ३:३० वाजता सुरू होणारी सभा ४:३० वाजता सुरू झाली. जेवणाच्या सुट्टीनंतर सभापतींसह पाच सदस्य सभेला उपस्थित होते.सर्वच एनएमएमटी डेपोंची बांधणी करावी, त्या ठिकाणी निर्माण करण्यात येणाऱ्या विविध सुविधा आणि उपाययोजनांमधून महापालिकेला उत्पन्न प्राप्त होणार आहे. शहरातील सर्व नोडमध्ये अद्ययावत वाहनतळ उभारण्यात यावेत.- डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक, प्रभाग क्रमांक १०४विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ पादचारी पूल उभारण्यात यावा. तलावांची चांगल्या पद्धतीने सुधारणा करण्यात यावी. गावठाण भागासाठी अग्निशमनच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.- ज्ञानेश्वर सुतार, नगरसेवक, प्रभाग क्र मांक ८९शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत, त्यामधून कोट्यवधी रु पयांची वसुली होऊ शकते. पदपथावरील फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसून, भरारी पथकावर नाहक खर्च होत आहे.- सलुजा सुतार, नगरसेविका, प्रभाग क्र मांक ९९अभय योजनेच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर कराव्यात, यामुळे थकीत करवसुली होण्यास मदत होणार आहे. फेरीवाल्यांवर निर्बंध घालणे गरजेचे आहे.- चेतन नाईक, नगरसेवक, प्रभाग क्र मांक २२शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी शहरात मुख्य चार प्रवेशद्वार उभारणे गरजेचे आहे. सिडकोकालीन गंजलेल्या पाण्याच्या मुख्य वाहिन्या बदलण्यात याव्यात.- रवींद्र इथापे, सभागृह नेतासीबीडी येथे रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी असतात, यासाठी ट्रक टर्मिनल उभारावे. आयकर कॉलनी समोर असलेल्या डॅमची सुधारणा करण्यात यावी. तसेच तलावात कारंजे आणि नौकाविहार सुरू केल्यास उत्पन्न प्राप्त होणार आहे.- सरोज पाटील, नगरसेविका, प्रभाग क्र मांक १०१सदस्यांनी केलेल्या विविध सूचनांनुसार ३०० कोटींची वाढ करून ४१५० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी महासभेत सादर केला जाणार आहे.- नवीन गवते, सभापती, स्थायी समिती

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका