शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

एनएमएमटीच्या तोट्यात होतेय वाढ, महिन्याला साडेतीन कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 02:10 IST

नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा (एनएमएमटी) तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा (एनएमएमटी) तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ७८ पैकी फक्त ३ मार्ग पूर्णपणे नफ्यामध्ये आहेत. ८ मार्ग ना नफा ना तोट्यावर सुरू असून, उर्वरित ६७ मार्ग तोट्यात सुरू आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रत्येक महिन्याला साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. परिवहन उपक्रमाने तोटा कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. परंतु जोपर्यंत शासनाकडून तिकीट दरवाढीच्या प्रस्तावास मंजुरी मिळत नाही तोपर्यंत तोट्याचे प्रमाण कमी करणे शक्य होणार नाही.एनएमएमटी उपक्रमाच्यावतीने सद्यस्थितीमध्ये नवी मुंबई, मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यात ७८ मार्गांवर सेवा दिली जात आहे. यामधील मनपा क्षेत्रामध्ये ११ मार्ग आहेत. मनपाच्या हद्दीत सुरू होऊन शहराबाहेर जाणारे ४७ मार्ग असून पूर्णपणे मनपा क्षेत्राबाहेर २० मार्ग आहेत. उपक्रमाचे घणसोली, तुर्भे व आसुडगाव असे ३ आगार असून जवळपास १६ डेपो आहेत. उपक्रमाकडे एकूण ४७६ बसेस आहेत. यामध्ये डिझेलवर चालणाºया २४४, सीएनजीवरील १५०, वातानुकूलित व्होल्वो ८० व २ हायब्रीड बसेसचा समावेश आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीप्रमाणे उपक्रमाच्या बसेस वर्षाला २५ लाख ५८ हजार किलोमीटर धावत आहेत. प्रचलित तिकीट दराप्रमाणे एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षामध्ये उपक्रमाला प्रत्येक महिन्याला सरासरी ९ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात खर्च १३ कोटी ३५ लाख रुपये झाला असून प्रत्येक महिन्याला जवळपास साडेतीन कोटी रुपये तोटा होऊ लागला आहे. सद्यस्थितीमध्ये प्रत्येक किलोमीटरला ३९ रुपये उत्पन्न होत असून खर्च ५३ रुपये होत आहे. प्रत्येक किलोमीटरला १४ रुपये तोटा होत असल्याची माहिती प्रशासनाने सर्वसाधारण सभेमध्ये दिली आहे.परिवहन उपक्रम तोट्यामध्ये जाण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये इंधन दरामध्ये सातत्याने होणारी वाढही कारणीभूत आहे. एक वर्षापूर्वी डिझेलचे दर ५० रुपये होते ते आता जवळपास सरासरी ६२ रुपयांवर गेले आहेत.दोन वर्षांमध्ये तिकीट दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे तोटा वाढू लागला आहे. परिवहन उपक्रमाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करून तो अंतिम मंजुरीसाठी परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला आहे. प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार असून त्यानंतर तोटा कमी करण्यात यश येऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.पूर्वीपेक्षा जाहिरातीच्या उत्पन्नामध्येही वाढ करण्यात आली असून भविष्यात महत्त्वाच्या डेपोंचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढ केली जाणार आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने प्रयत्न केला तर उपक्रमाचा तोटा भरून काढणे शक्य होईल, असेही मत व्यक्त केले जात आहे.>दरवाढीकडे लक्षपरिवहन उपक्रमाने तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवीन तिकीट दराची अंमलबजावणी झाल्यानंतर तोटा कमी होणे शक्य होणार आहे.जाहिरातीमधूनउत्पन्न वाढलेमहापालिकेच्या डेपो व बसथांब्यावरील जाहिरातीच्या माध्यमातून पूर्वी उपक्रमास १५ ते १६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. प्रशासनाने घेतलेल्या योग्य निर्णयामुळे ते उत्पन्न जवळपास ४२ लाखांवर गेले आहे. अशाचप्रकारे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.>वाशी डेपोचा विकासउपक्रमाने महत्त्वाच्या डेपोंचा व्यावसायिकदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर वाशी डेपोचा विकास केला जाणार आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या माध्यमातून महिन्याला जवळपास अडीच कोटीरुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.> मनपा क्षेत्रातील बस मार्ग व प्रति किलोमीटर उत्पन्नमार्गाचे नाव उत्पन्नवाशी रेल्वे स्टेशन ते कोपरखैरणे रेल्वे स्टेशन २०.३५रबाळे रेल्वे स्टेशन ते अल्फा लेवल ११.३६घणसोली आगार / घरोंदा ते वाशी गाव ४३.३९घणसोली आगार / घरोंदा ते सानपाडा रेल्वे स्थानक २३.७२नेरूळ सेक्टर ४६ ते डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ २३.६६कोपरखैरणे बस स्थानक ते सीबीडी बसस्थानक १८.१०घणसोली आगार ते नेरूळ सेक्टर ४६ ३७.९२घणसोली आगार ते आर्टिस्ट कॉलनी २१.२१वाशी सेक्टर ७ ते सीबीडी बस स्थानक २४.६डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ते आर्टिस्ट कॉलनी १७.५९नेरूळ रेल्वे स्थानक ते सीबीडी बस स्थानक २६.६७> शहराबाहेरील कमी उत्पन्न असलेले बस मार्गमार्गाचे नाव उत्पन्नवाशी रेल्वे स्थानक ते ठाणे मार्गे सानपाडा १०.२नेरूळ सेक्टर ४६ ते ठाणे मार्गे सानपाडा १७.४३सीबीडी बस स्थानक ते ठाणे मार्गे बेलापूर गाव १६.७५नेरूळ सेक्टर ४६ ते दादर हिंदमाता मार्गे मोराज १६.७८ऐरोली बस स्थानक ते मंत्रालय १६.४> शहराबाहेरील जास्त उत्पन्न असलेले बस मार्गमार्गाचे नाव उत्पन्ननेरूळ रेल्वे स्थानक ते बामनडोंगरी रेल्वे स्थानक ४८.४घणसोली आगार ते पेठाली गाव फेज १ ३९.१०ऐरोली बस स्थानक ते आगरकर चौक अंधेरी पूर्व ४४.३२घणसोली घरोंदा ते वसंतराव नाईक चौक ४२.१ऐरोली बस स्थानक ते बोरीवली पूर्व मार्गे ठाणे घोडबंदर ५२.४९> शहराबाहेरील जास्त उत्पन्न असलेल्या बसमार्गाचे नाव उत्पन्नखारघर रेल्वे स्थानक ते खारघर सेक्टर २७ ४०.६७खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा आरएएफ ५०.३८पोलीस मुख्यालय कळंबोली ते मानसरोवर रेल्वे स्टेशन ४८.८४पनवेल स्टेशन ते महालक्ष्मी नगर नेरे ४२.५९खारघर जलवायू ते बोरीवली पूर्व ४०.१५खारघर ओवे गाव ते बोरीवली पूर्व ४८.७४