शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीवूडमधील कामामुळे गैरसोय

By admin | Updated: April 11, 2016 01:41 IST

सीवूड रेल्वे स्थानकात फलाटाच्या सुरू असलेल्या कामामुळे प्रवाशांची त्या ठिकाणची पाऊलवाट बंद झाली आहे. यामुळे पश्चिमेकडील चाकरमान्यांना स्थानकात जाण्यासाठी पायपीट करावी लागत

नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्थानकात फलाटाच्या सुरू असलेल्या कामामुळे प्रवाशांची त्या ठिकाणची पाऊलवाट बंद झाली आहे. यामुळे पश्चिमेकडील चाकरमान्यांना स्थानकात जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामुळे घाईमध्ये असलेल्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पर्यायी सोय करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.सीवूड रेल्वे स्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे सीवूड - दारावे परिसरातील प्रवाशांची तूर्तास गैरसोय होत आहे. बांधकाम सुरू असल्यामुळे स्थानकात जाण्यासाठी पर्यायी उपलब्ध केलेले मार्ग प्रवाशांच्या गैरसोयीचे आहेत. यामुळे सीवूड येथील पुलाखाली उपलब्ध जागेचा वापर स्थानकात जाण्यासाठी होत आहे. परंतु नुकतेच जुन्या रेल्वेरुळाच्या कामाला सुरुवात झाल्याने प्रवाशांचा पुलाखालील हा पर्यायी मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे सीवूड पश्चिमेकडील प्रवाशांना सुमारे एक किलोमीटरची पायपीट करीत स्थानकात जावे लागत आहे. यामुळे चाकरमान्यांची गैरसोय होत असल्याचे शिवसेनेचे शाखाप्रमुख समीर बागवान यांचे म्हणणे आहे. याकरिता त्यांनी सदर ठिकाणी सुरू असलेले काम तूर्तास बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. अगोदर प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या. त्यानंतरच रुळाच्या कामाला सुरुवात करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी सिडको प्रशासनाला दिले आहे. (प्रतिनिधी)