शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थलांतरणाकरिता प्रोत्साहन भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:25 IST

विमानतळाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थलांतरणाकरिता विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मेपर्यंत ही योजना सुरू असणार आहे.

नवी मुंबई : विमानतळाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थलांतरणाकरिता विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मेपर्यंत ही योजना सुरू असणार आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरित होणाºया बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत भूखंडांच्या वाटपासोबतच बांधकाम अनुदान व घरभाडे यांसारखे लाभ देण्यात येत आहेत. या लाभांव्यतिरिक्त प्रकल्पबाधित बांधकामधारकांना बांधकाम निष्कासित केल्यानंतर विशेष प्रोत्साहन भत्ता देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. लवकर स्थलांतरित होणाºयांना मुदतनिहाय भत्ता देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तीन टप्यामध्ये ही योजना लागू केली आहे. जे प्रकल्पबाधित ३१ मार्च २०१८पर्यंत त्यांची बांधकामे निष्कासित करतील त्यांना बांधकाम अनुदानाव्यतिरिक्त निष्कासित बांधकामांसाठी ५०० प्रति चौरस फूट दराने प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. जे नागरिक ३० एप्रिलपर्यंत बांधकाम निष्कासित करतील त्यांना प्रतिचौरस फूट ३०० व ३१ मेपर्यंत निष्कासित करणाºयांना प्रतिचौरस फूट १०० रूपये दराने प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.विमानतळ बांधकामधारकांना १ मार्च २०१४ च्या मूळ पॅकेजनुसार भूखंड व इतर आर्थिक लाभ देण्यात येण्यात येत आहेत. इतर आर्थिक लाभांतर्गत बांधकाम अनुदान प्रति चौरस फुटास १ हजार एक रकमी निर्वाह भत्ता ३६ हजार व एकरकमी आर्थिक सहाय १ लाख २४ हजार ५०० देण्यात येणार आहे. याशिवाय वाहतुकीसाठी ५० हजार रूपये देण्यात येणार आहेत. विमानतळ कंपनी स्थापन झाल्यानंतर १० दर्शनी मूल्य असलेले १०० समभागही देण्यात आलेले आहेत.पॅकेजमध्ये सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न -शासनाने २२ सप्टेंबर २०१७ च्या सुधारीत पॅकेजमध्ये सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकल्पबाधित बांधकामधारकांची सर्वेक्षण झालेली शून्य पात्रतेची बांधकामे, पती, पत्नी यांची स्वतंत्र बांधकामे व बांधकामधारकांची एकाहून जास्त असलेली बांधकामे यांनाही पात्र ठरवून भूखंड देऊन मूळ पॅकेजनुसार इतर आर्थिक लाभ देखील लागू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ७०० चौरस मीटर क्षेत्राची मर्यादा काढून उर्वरीत क्षेत्राचे भूखंड गोठ्याची बांधकामे पात्र ठरवून त्यांनाही वाणिज्यिक वापरानुसार लाभ दिलेले आहेत. आॅक्टोंबर २०१७ पासून १८ महिन्यांसाठी घरभाडे योजनाही लागू केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ