शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दस-याच्या मुहूर्तावरकोपरीतील अ‍ॅम्युजमेंट पार्कचे लोकार्पण, अत्याधुनिक दर्जाच्या खेळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 05:35 IST

महापालिकेच्या माध्यमातून कोपरी येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अ‍ॅम्युजमेंट पार्कचे दसºयाच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले.

नवी मुंबई : महापालिकेच्या माध्यमातून कोपरी येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अ‍ॅम्युजमेंट पार्कचे दसºयाच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले. महापौर सुधाकर सोनावणे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पार्कचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले.कोपरी परिसरात मुलांना खेळण्यासाठी व मनोरंजनासाठी एकही उद्यान नव्हते. त्यामुळे या परिसरात एक अत्याधुनिक स्वरूपाचे उद्यान विकसित करावे, अशी मागणी या क्षेत्रातील रहिवाशांची होती. त्यानुसार महापालिकेने कोपरी सेक्टर २६ येथे सुमारे दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर हे अ‍ॅम्युजमेंट पार्क साकारले आहे. या पार्कमध्ये अत्याधुनिक स्वरूपाची विविध खेळणी आहेत. विशेषत: पार्कमधील महाकाय कासवाची प्रतिकृती हे प्रमुख आकर्षण ठरले आहे. त्याशिवाय लहान मुलांसाठी खास प्ले झोन असून, खेळताना दुखापत होऊ नये, यादृष्टीने उच्च दर्जाच्या रबर मॅटचे फ्लोरिंग टाकण्यात आले आहे. स्केटिंग रिंग, इव्हेंट प्लाझा, ज्येष्ठांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आदी दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या पार्कचे वेगळेपण नवी मुंबईच नव्हे, तर इतर शहरांतून येणाºया नागरिकांनाही भुरळ घालणारे असल्याचे प्रतिपादन महापौर सुधाकर सोनवणे यांनी या वेळी केले. तर शहरात सध्या अडीचशेपेक्षा अधिक उद्याने आहेत. त्यात आता कोपरीतील उद्यानाची भर पडली आहे. बंगळुरूप्रमाणेच नवी मुंबई शहरालाही आता गार्डन सिटी म्हणून ओळख प्राप्त होत असल्याचे मतमहापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.या कार्यक्रमाला ऐरोलीचे आमदारही उपस्थित होते. तसेच उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, स्थानिक नगरसेविका उषा भोईर आदीसह विविध समितींचे सभापती, उपसभापती, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.