शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पनवेलमध्ये नागरिकांचे हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:00 IST

पनवेल - कोरोनाच्या  भीतीमुळे नागरिक चिंताग्रस्त होवून घरात बसले असताना नवीन पनवेलच्या काही भागांत घरात बसलेल्या नागरिकांना पाण्याची समस्या ...

पनवेल - कोरोनाच्या  भीतीमुळे नागरिक चिंताग्रस्त होवून घरात बसले असताना नवीन पनवेलच्या काही भागांत घरात बसलेल्या नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. मागील आठवड्यापासून कमी दाबाने पाणिपुरवठा होत आहे. त्यामुळे नवीन पनवेलच्या काही भागातील नागरिक सध्या त्रस्त आहेत.  नवीन पनवेल सेक्टर ६, १० आणि १९ मध्ये ही तक्रार असल्याचे नागरिकांनी सांगितले. सेक्टर १९ मध्ये राहणारे ज्ञानेश्वर पाटील यांनी सिडकोच्या पाणिपुरवठा विभागाकडून दोन दिवसांपासून तक्रार केली मात्र पाणि संध्याकाळी येईल, सकाळी येईल अशी कारणे सांगितली जात आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या शटडाऊनमुळे पाण्याचा तुटवडा असल्याचे ज्ञानेश्वर पाटील यांना सिडकोचे पाणिपुरवठा विभागातील अभियंता राहूल सरोदे यांनी सांगितले. सेक्टर १९ मधील काही इमारतीमध्ये खासगी टँकरने पाणिपुरवठा करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. चार दिवसानंतर अखेर मंगळवारी दुपारी पाणि आले मात्र पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्यामुळे पुरेसे पाणि नागरिकांना मिळाले नाही.खारघर मध्येही अपुरा पाणीपुरवठा खारघर शहरासह आजूबाजूचे गाव आदिवासी वाड्यामध्ये सध्याच्या घडीला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत .शहरातील रांजणपाडा गावात मागील महिनाभरापासून भीषण पाणी समस्या असताना स्थानिक नगरसेवक पालीका प्रशासन काहीच कारवाई करीत नसल्याचे येथील ग्रामस्थ मच्छिद्र चौधरी यांचे म्हणणे आहे.शहरातील धामोळे आदिवासी वाडीत देखील हीच समस्या आहे.

टॅग्स :Waterपाणीpanvelपनवेल