शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेतही हुक्का, पबला पहाटेपर्यंत ढील; कारवाईत सर्वच प्रशासनाचे हात आखडते 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 28, 2024 18:00 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता लागल्याने पोलिसांवर गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याचा मोठा ताण आहे.

सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता लागल्याने पोलिसांवर गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याचा मोठा ताण आहे. अशातच हुक्का, पब, बार यांना पहाटे पर्यंत छुपी मुभा मिळत आहे. यामुळे गुन्हेगारी कृत्यांना थारा मिळत असून उमेदवारांच्या बेहिशोबी पार्ट्या देखील अशा ठिकाणी रंगण्याची शक्यता आहे. 

नवी मुंबईतले अवैध धंदे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळातही बंद होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पहाटे पर्यंत हुक्का पार्लर, पब चालत असून संबंधित प्रशासनांकडून त्यावर कारवाईत हात आखडता घेतला जात आहे. परिणामी स्थानिक पोलिसांकडून देखील कारवाईतल्या मर्यादेच्या आडून हात आखडते घेऊन, हात धुवून घेतले जात आहेत. वाशी, सानपाडा येथे चालणाऱ्या टेरेस क्लबचे तरुणाईत मोठे आकर्षण आहे. 

पहाटेपर्यंत त्याठिकाणी पब चालत असतानाही कारवाईचे धाडस केले जात नाही. त्यासाठी अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे देखील करण्यात आली आहेत. तर ज्या व्यवसायासाठी परवाना घेतला आहे, त्या ऐवजी भलतेच उद्योग चालत असतानाही परवाना विभाग हातावर घडी घालून बसत आहे. त्यावरून सर्वच प्रशासन अशा अवैध धंद्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. अशातच सानपाडा येथील मचाओ पब पहाटेपर्यंत चालत असल्याचे पुन्हा एकदा बिल स्वरूपात समोर आले आहे. तर वाशीत टेरेसवर चालणाऱ्या हाऊस ला कोणत्या "लॉर्ड" चे पाठबळ आहे ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पहाटेपर्यंत चालणाऱ्या पब, हुक्का पार्लरमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण, काही बड्या घरचे तरुण तरुणी मध्यरात्री पर्यंत वाशी परिसरात भडकत असतात. त्यातून हाणामारीच्या देखील घटना मागील काही दिवसात घडल्या आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात देखील असे प्रकार घडत राहिल्यास निवडणुकीला गालबोट लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई