शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित धोरण झोपडीमाफियांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 07:04 IST

राज्य सरकारने २०११पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय २०००नंतर उभारलेल्या हजारो झोपडीधारकांच्या पथ्यावर पडला आहे. विशेष म्हणजे, मागील दहा वर्षांत नवी मुंबईत बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहेत.

नवी मुंबई  - राज्य सरकारने २०११पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय २०००नंतर उभारलेल्या हजारो झोपडीधारकांच्या पथ्यावर पडला आहे. विशेष म्हणजे, मागील दहा वर्षांत नवी मुंबईत बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहेत. राज्य सरकारच्या सुधारित धोरणांचा लाभ आता या झोपड्यांनाही मिळणार आहे, असे असले तरी पात्र झोपड्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेला पार पाडावी लागणार आहे.महापालिकेने २००१मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात सुमारे ४२ हजार झोपड्या आहेत. यापैकी सन २०००पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे राज्य सरकारचे जुने धोरण होते. एसआरए योजनेअंतर्गत या झोपड्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भातील महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून आहे; परंतु आता झोपड्यांसाठी नवीन धोरण जाहीर झाल्याने हा प्रस्ताव कायमस्वरूपी बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शहरात बेकायदा झोपड्या उभारून त्याची अल्पदरात विक्री करण्याचा गोरखधंदा तेजीत सुरू आहे. विशेषत: ऐरोली, दिघा, चिंचपाडा, यादवनगर, महापे, तुर्भे आदी एमआयडीसी परिसरात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नवीन झोपड्या उभारल्या आहेत.पूर्वी राज्य सरकारने १९९५पर्यंतच्या झोपड्यांना अभय दिले होते. त्यानंतर २०००पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण जाहीर करण्यात आले. आता २०११पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार झोपडीधारकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल देण्याची शासनाची योजना आहे. असे असले तरी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत जाणकारांत संभ्रमाचे वातावरण आहे. त्या-त्या वेळी धोरण राबवून झोपड्यांचे पुनर्वसन केले असते, तर वेळोवेळी या धोरणात बदल करण्याची आवश्यकता भासली नसती, असे जाणकारांचे म्हणणे आहे. केवळ झोपडीधारकांच्या मतावर डोळा ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला जात आहे.एमआयडीसीच्या जागेवर सर्वाधिक झोपड्यामहापालिका हद्दीत सिडको, एमआयडीसी आणि शासकीय जमिनीवर झोपडपट्ट्यांचा विस्तार झालेला आहे. महापालिकेने सन २००१मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात ४१ हजार ८०५ झोपड्या आहेत. यापैकी १९९५ पूर्वीच्या पात्र ठरलेल्या १९,०८९ झोपड्या आहेत. तर अपात्र ठरलेल्या झोपड्यांची संख्या २२,७१६ आहे. शहरातील एकूण झोपड्यांपैकी सर्वाधिक झोपड्या एमआयडीसीच्या जागेवर आहेत. मागील दहा वर्षांत यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या