शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पूरस्थितीमुळे स्थलांतरित डुंगी ग्रामस्थ चिंतेत; ओस पडलेल्या गावात चोरीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 04:25 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे डुंगी ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत.

- वैभव गायकरपनवेल : अतिवृष्टीमुळे डुंगी गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण गावाला करंजाडे येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले. येथील शाळेमधील दोन वर्गात या ग्रामस्थांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र स्थलांतरित केलेले डुंगी ग्रामस्थ गावात चोरीच्या भीतीने चिंतेत आहेत.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे डुंगी ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत. मागील वर्षी देखील गावात पुराचे पाणी शिरले होते. मध्यंतरी डुंगी गावाचे देखील पुनर्वसन करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. तास प्रस्ताव सिडकोने शासनाकडे पाठविला आहे. मात्र गावात शिरलेल्या पाण्यामुळे संपूर्ण गावाचे येथील कारंजाडे शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरित केल्यानंतर संपूर्ण डुंगी गाव ओस पडले आहे. ग्रामस्थांचे स्थलांतर केले असले तरी घरातील मौल्यवान वस्तू, सर्व सामान घरात असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. करंजाडे येथील गावातील शाळेतील दोन वर्गात ग्रामस्थांची राहायची व्यवस्था करण्यात आली आहे. सिडकोने वेळीच योग्य भूमिका घेतली नसल्याने ग्रामस्थांचे हाल सुरु आहेत. दरम्यान पावसाळ्यात ग्रामस्थांनी बाहेर राहण्यासाठी तहसील प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना ५0 हजारांची मदत तहसीलदार अमित सानप यांनी केली. त्यानुसार बुधवारी ५0 हजारांचे धनादेश वाटप करण्यात आले. यामध्ये १११ कुटुंबांना धनादेशाचे वाटप करण्यात आले तर उर्वरित ३0 कुटुंबाची चाचपणी सुरु असल्याचे सानप यांनी सांगितले. लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी स्थलांतरित ग्रामस्थांची भेट घेवून सहकार्याचे आश्वासन दिले होते.पोलीस बळ पुरविण्याची मागणीस्थलांतरित झाल्यानंतर गाव ओस पडले आहे. गावातील विद्युत पुरवठा देखील बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रात्री चोरीची घटना होऊ शकते. अशा परिस्थितीत गावात विद्युत पुरवठा सुरळीत करून गावात पोलीस बंदोबस्त द्यावा जेणेकरून गावात अनुचित प्रकार होणार नसल्याची मागणी ग्रामस्थ महेंद्र पाटील, मधुकर नाईक यांनी केली आहे.बंबावी कोळीवाड्यालादेखील भरपाई द्याबंबावी कोळीवाड्यात देखील पूरसदृश स्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे.अनेक घरात पाणी शिरल्याने येथील रहिवाशांचे मोठे नुकसान झाल्याने या ग्रामस्थांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मयूर भोईर यांनी सिडको व तहसीलदारांकडे केली आहे.

टॅग्स :panvelपनवेल