शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा व्यवसायाचा होतोय अधिकृत व्यापाऱ्यांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 01:28 IST

एपीएमसीतील प्रकार: पालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांकडे तक्रार

n  लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : एपीएमसी मार्केटमधील अवैध व्यवसायाचा फटका येथील अधिकृत व्यापाऱ्यांना बसला आहे. अधिकृत गाळ्यांच्या समोरच अनधिकृत व्यापार सुरू असल्याने हे व्यापारी संतप्त झाले आहेत. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे केली आहे.सानपाडा रेल्वे स्थानकाकडून माथाडी भवनपर्यंतच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यापार सुरू आहे. विशेषत: एपीएमसी वाहतूक शाखा ते माथाडी भवन दरम्यानचा रस्ता आणि पदपथ अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापला आहे. काही ठिकाणी तर चक्क रस्तेच अडविले आहेत. मागील अनेक दिवसांपासून फळ मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावर टॅम्पोतून कांदा-बटाट्याचा अनधिकृत व्यवसाय सुरू आहे. माथाडी भवनपर्यंतच्या अंतरावर टप्प्याटप्प्यावर अनधिकृत व्यवसाय करणारे असे टेम्पो उभे असल्याचे दिसून येते. त्यांच्या जोडीला फेरीवाल्यांची फौज असून, या परिसरातील दळवळण यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे, तसेच कोरोनाचे संकट अद्यापी कायम आहे, परंतु या भागात कोरोनाविषय नियमांना सपशेल हरताळ फासला जात आहे. शारीरिक अंतर राखणे तर दूरच, मास्कचा वापरही केला जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, वारंवार तक्रार करूनही या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई होताना दिसत नाही. महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे फेरीवाल्यांचा अनधिकृत व्यवसाय फोफावत चालल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.गुरुवारी माथाडी भवनमधील काही गाळेधारकांनी आपले व्यवसाय बंद करून महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयावर धडक दिली. माथाडी भवनसमोरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली, परंतु तीन दिवस उलटले, तरी या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही.महापालिकेच्या माध्यमातून येथील अनधिकृत व्यवसायांवर कारवाई होणे गरजेचे आहे, परंतु तक्रार करूनही कारवाईला बगल दिली जात आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी.- चंद्रकांत पाटील, माथाडी युनियनचे संयुक्त सरचिटणीस, माजी नगरसेवक