शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

माथाडींच्या घरांची बेकायदा विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 03:24 IST

माथाडी कामगारांच्या नावे घरे मिळवून सिडकोच्या एनओसीशिवाय परस्पर विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारात सिडकोच्या अटी व शर्तींचा

सूर्यकांत वाघमारे  नवी मुंबई : माथाडी कामगारांच्या नावे घरे मिळवून सिडकोच्या एनओसीशिवाय परस्पर विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारात सिडकोच्या अटी व शर्तींचा भंग करून शासनाचीही फसवणूक होत आहे. त्यामुळे माथाडी कामगारांच्या नावे घरे लाटून त्यांची विक्री करण्याचा धंदा होत असल्याचा संशय बळावला आहे.माथाडी कामगारांसाठी सवलतीच्या दरात भूखंड मिळवून, त्याचा काही भाग खासगी विकासकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपावरून अखिल महाराष्टÑ माथाडी कामगार युनियन व सभासद यांच्यातच वाद सुरू आहे. अशातच त्याच सोसायटीमधील घरे ताबा मिळण्यापूर्वीच बिगर माथाडींना विकली गेल्याचे समोर आले आहे. निम्म्याहून अधिक सदनिकाधारकांनी चार ते पाच वर्षांपूर्वीच हा व्यवहार केलेला आहे. बांधकाम खर्च व इतर खर्च मिळून सुमारे ७ लाखांना माथाडी कामगारांना ही घरे मिळणार आहेत. त्यापैकी अनेकांनी अद्याप घरांचा ताबा नसतानाही ती बिगर माथाडींना विकली आहेत. विशेष म्हणजे या घरांच्या खरेदी-विक्रीचे रजिस्ट्रेशन देखील विना अडथळा होत आहे.माथाडी कामगारांकरिता शासनाकडून घरे मिळवण्यावरून कामगारांच्या विविध संघटनांमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे वाटप होणारी घरे गरजू माथाडींनाच मिळत आहेत का, त्यांचे यापूर्वीचे घर आहे का ? हे तपासण्याची संपूर्ण जबाबदारी सिडकोची आहे. त्याची खातरजमा न करताच केवळ हमीपत्राच्या आधारे संघटना सांगेल त्या व्यक्तीला घरांचे वाटप होत आहे. या प्रकारात मूळ माथाडी कामगार घरांच्या लाभापासून वंचित राहत असून, नेत्यांच्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांची स्थावर मालमत्ता वाढत चालली आहे.त्याकरिता माथाडी कामगारांच्या नावे मिळणारे घर संबंधितांच्या ताब्यात येण्यापूर्वीच त्यांचे व्यवहार ठरवले जात आहेत. दीड वर्षापूर्वी घणसोली परिसरात माथाडी कामगारांच्या सोसायट्या उभारल्या आहेत. सद्यस्थितीला त्यामधील निम्म्याहून अधिक घरांची विक्री झाल्याचे समोर येत आहे, तर उर्वरित घरे भाड्याने देण्यासाठी वापरली जात आहेत. यामुळे माथाडी वसाहतींमध्ये भाडेकरू व पेर्इंग गेस्ट यांचेच अस्तित्व दिसत असल्याने तिथला माथाडी कामगार नेमका राहतोय कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचा उलगडा करण्यासाठी माथाडींना वाटप झालेल्या घरांचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. त्यामध्ये माथाडींच्या घरांचा मोठा घोटाळा उघडकीस येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.