शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

वाहनतळाच्या नियोजनाअभावी बेकायदा पार्किंगचा स्वच्छता अभियानाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 23:25 IST

शहरवासीयांची डोकेदुखी: वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर वाहतूककोंडी

नवी मुंबई :  शहराची उभारणी करताना वाहनतळाचे नियोजन करण्याचे राहून गेले. त्यामुळे जागा मिळेल तेथे वाहने पार्क करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. याचा फटका सध्या सुरू असलेल्या महापालिकेच्या स्वच्छता अभियानाला बसला आहे, शिवाय वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर नागरिकांना या समस्येचा कायमस्वरूपी सामना करावा लागत आहे.

सिडकोने सुनियोजित असे नवी मुंबई शहर उभारले. वेगवेगळ्या नोड्समध्ये शहराची आखणी करण्यात आली. शहराचे नियोजन करताना संबंधित नोड्समधील वीस वर्षांनंतरची लोकसंख्या गृहीत धरून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या, परंतु कालांतराने सिडकोचे हे नियोजन पुरते फसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील वाहनांची संख्याही वाढली. त्यामुळे रस्ते आणि पार्किंगच्या सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. वसाहतीअंतर्गच्या अरुंद रस्त्यावर वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेकडून विविध योजना तयार करण्यात आल्या.

गृहनिर्माण सोसायटीतील वाहनधारकांनी आपली वाहने सोसायटीच्या आवारातच उभी करण्याचे फर्मान सोडण्यात आले. वसाहतीअंतर्गत रस्त्यावर वाहने पार्क करण्यास मज्जाव करण्यात आला. सम-विषम पार्किंगचा पर्यायही देण्यात आला. हे आदेश न जुमानणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाईचा बडगाही उगारण्यात आला, परंतु वाहतूककोंडीची समस्या मात्र जैसे थे राहिली. आजतागायत ही समस्या कायम असून, भविष्यात ती अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाला कृषिमालाची शेकडो ट्रक व इतर वाहने येतात. मार्केटमध्ये रिकामी केल्यानंतर ही वाहने जागा मिळेल, तेथे पार्क केली जातात. मार्केट परिसरातच भव्य ट्रक टर्मिनल असतानाही, अनेक वाहनधारक वसाहतीअंतर्गच्या छोट्या रस्त्यांवर आपले ट्रक आणि टेम्पो उभे करतात. त्यामुळे अनेक ठिकाणी बेकायदा वाहनतळ सुरू झाले आहेत. महापालिका, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पुढारी यांच्या संगनमताने अनधिकृत वाहनतळाचा धंदा सध्या तेजीत असल्याचे पाहावयास मिळते.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका