शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पामबीच मार्गावरील बेकायदा गॅरेजेस्ची धडधड पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:58 IST

कारवाईला केराची टोपली : वाहतूककोंडीमुळे अपघाताची शक्यता

नवी मुंबई : पामबीच मार्गावरील वाशी येथील गॅरेजेस् आणि वाहनांच्या स्पेअर पार्टची दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी काही महिन्यांपूर्वी येथील गॅरेजेस् व स्पेअर पार्टच्या दुकानांवर कारवाई केली होती. दुरुस्तीसाठी पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने जप्ती आणली होती. मात्र कारवाईचा ज्वर ओसरताच पुन्हा येथील व्यवहार जैसे थे झाल्याचे दिसून आले आहे.

पामबीच मार्गालगतच्या व्यावसायिक गाळ्यांना मागच्या बाजूने प्रवेशद्वार निश्चित करण्यात आले आहे. बांधकाम परवानगी देतानाच तशी तरतूद करण्यात आलेली आहे. पामबीचवरील सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र येथील सत्र प्लाझा ते एपीएमसीकडे जाणाºया वळणापर्यंतच्या मार्गावरील बहुतांशी दुकानदारांनी पामबीच मार्गाच्या दिशेने प्रवेशद्वारे केली आहेत. यात हॉटेल्स, शोरूम्स तसेच वाहनांचे स्पेअर पार्ट्स विक्रेते, गॅरेजेस् आदींचा समावेश आहे. सर्वाधिक प्रमाण गॅरेजेस् व स्पेअर पार्ट विक्रीच्या दुकानांचे आहे. दुरुस्तीसाठी येणाºया वाहनांची येथे रीघ लागलेली असते. वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामुळे या परिसरात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अनेकदा लहानमोठे अपघात होत आहेत. यासंदर्भात वाढत्या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी येथील गॅरेजेस् व स्पेअर पार्टच्या दुकानांवर गंडांतर आणले होते. नोटिसा बजावून पामबीच मार्गाकडील प्रवेशद्वार बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच या परिसरात वाहतूक विभागाच्या समन्वयाने नो पार्किंगचे फलक लावले होते. परिणामी, काही दिवस या मार्गाने मोकळा श्वास घेतला होता. मात्र मागील काही दिवसांपासून येथील व्यवहार पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहेत. दुरुस्तीसाठी वाहनांच्या रस्त्यावर रांगा लागत आहेत. स्पेअर पार्ट्स विक्रीची दुकाने जोमाने सुरू आहेत. नो पार्किंगच्या फलकांकडे कानाडोळा करीत बेकायदा पार्किंग सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे पामबीच मार्गाच्या निर्मितीच्या मूळ हेतूला हरताळ फासला जात असल्याने यासंदर्भात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.दोन्ही दिशांना बेकायदा पार्किंगपामबीच मार्गावर वाहनांच्या पार्किंगला मज्जाव आहे. परंतु या मार्गाच्या वाशीतील भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सर्रास वाहने पार्क केली जातात. विशेष म्हणजे दोन्ही बाजूंना नो पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र या फलकांना केराचा टोपली दाखवत वाहनधारक व येथील व्यावसायिक मनमानी पद्धतीने वाहने उभी करीत असल्याने या मार्गावरील सुरक्षित वाहतुकीला हरताळ फासला जात आहे.