शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बेकायदा गॅरेजमुळे रहदारीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:59 IST

पालिकेचे दुर्लक्ष; बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघातील स्थिती

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पदपथ आणि रस्त्यांवर बेकायदेशीरपणे गॅरेज थाटण्यात आले आहेत. या गॅरेजमुळे रहदारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, तसेच अस्वच्छताही झाली आहे.नवी मुंबई शहर हे नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखले जाते, परंतु वाढलेल्या वाहनांमुळे विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेकायदा वाहने पार्किंग, अनधिकृत फेरीवाले, बेकायदा गॅरेज अशा समस्यांचा समावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नवी मुंबईने राज्यात पहिल्या क्रमांकचे स्थान कायम ठेवले असून, या वर्षी देशात पहिल्या क्रमांकचे स्थान पटकाविण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात असून, नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. शहरातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा सर्वच विभागात पदपथ आणि रस्त्यांवर बेकायदा गॅरेज मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. गॅरेजचालकांनी रस्ते आणि पदपथ काबीज केले असून, यामुळे रहदारीला अडथळा होत असून, अनेक ठिकाणी वाहतूककोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. गॅरेज सुरू असलेले रस्ते आणि पदपथ ऑइलमुळे काळे झाले आहेत, तसेच या परिसरात कचरा होत आहे. शहरात अभियान राबविताना याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पदपथ आणि रस्ते मोकळे व्हावेत, यासाठी पालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.जुनी वाहने विक्रीसाठीगॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणारी वाहने पदपथ आणि रस्त्यांच्या कडेला उभी केली जातात, तसेच यामध्ये विक्रीसाठी जुनी वाहने, अपघातग्रस्त वाहनांचाही समावेश असतो. ही वाहने अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी केलेली असतात, यामुळेही दैनंदिन स्वच्छतेला अडथळा निर्माण होत आहे.