शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या आडून बेकायदा बांधकामांचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 01:36 IST

कोपरखैरणेतील प्रकार : स्वच्छ सर्वेक्षणाला हरताळ

ठळक मुद्देशहरात सध्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू आहे. देशात प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. याचा फायदा घेत कोपरखैरणे परिसरातील बैठ्या चाळींतून मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेल्या महापालिकेच्या विभाग कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. 

कोपरखैरणे विभागात मोठ्या प्रमाणात माथाडी वसाहती आहेत. या वसाहतींतील बैठ्या घरांवर वाढीव बांधकाम केले जात आहे. अनेकांनी दोन ते तीन मजल्यांपर्यंत बांधकामे केली आहेत. विशेष म्हणजे एका मजल्याची परवानगी घेऊन बेकायदेशीररीत्या दोन ते तीन मजल्यांपर्यंत बांधकाम केले जात आहे. बहुतांशी बैठ्या घरांचा ‘ निचे दुकान, उपर मकान’ अशा पद्धतीने वापर सुरू आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. मध्यंतरीच्या काळात अशा बेकायदा बांधकामांच्या विरोधात महापालिकेने कंबर कसली होती. 

अनेक बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, कोविडमध्ये कारवाई शिथिल झाल्याने अशा प्रकारच्या बांधकामांचा पुन्हा धडाका सुरू झाला आहे. मागील काही दिवसांपासून सेक्टर २ येथे एकाच रांगेत पाच ते सहा घरांचे वाढीव बांधकाम सुरू आहे. त्यासाठी लागणारी खडी, रेती व विटा रस्त्यांवरच टाकल्याने परिसरातील दळवळण प्रभावित झाले आहे. रस्त्यावर खडी व रेती विखुरल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले घसरून पडत आहेत. त्यात अनेक जणांना किरकोळ दुखापती झाल्याचे समोर आले आहे. शहरात सध्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू आहे. देशात प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले जात आहे. 

बेकायदा बांधकामांवर कारवाई कराकोपरखैरणेत सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे  स्वच्छता अभियानाला हरताळ फासला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या संबंधित विभागाने अशा बांधकामांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई