शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
2
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
3
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
4
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
5
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
6
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
8
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
9
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
10
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
11
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
12
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
13
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
14
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
15
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
16
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
17
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
18
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
19
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
20
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड

अवैध शस्त्र : केडीएमसीचे नगरसेवक गायकवाड अटकेत

By admin | Updated: July 30, 2015 00:36 IST

बेकायदा शस्त्र खरेदी प्रकरणी तुर्भे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये कल्याण - डोंबिवली महापालिकेचा विद्यमान नगरसेवक महेंद्र गायकवाड याचाही समावेश आहे.

नवी मुंबई : बेकायदा शस्त्र खरेदी प्रकरणी तुर्भे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये कल्याण - डोंबिवली महापालिकेचा विद्यमान नगरसेवक महेंद्र गायकवाड याचाही समावेश आहे. महापालिकेच्या येत्या निवडणुकीत विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे पिस्तूल खरेदी केल्याची कबुली त्याने दिली आहे.महेंद्र गायकवाड सलग दोनदा निवडून आला आहे. त्यामुळे आपल्याला प्रतिस्पर्ध्यांकडून भीती होती. काही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडेही अवैध शस्त्रे असल्याने असुरक्षित वाटत होते. त्यामुळे आपणही सोबत पिस्तूल बाळगल्याची कबुली गायकवाड याने दिली. अवैध शस्त्र विक्रीसाठी आलेले तिघे व खरेदीसाठी आलेले दोघे अशा पाच जणांना तुर्भे पोलिसांनी गेल्या आठवड्यात पकडले. त्यांच्याकडून सहा पिस्तूल, १३ मॅगझीन, ८९ काडतुसे व गुन्ह्णासाठी वापरलेल्या दोन कार असा मुद्देमाल जप्त केला होता. अर्शद शफी अन्वर अहमद (२४), दानिश समशाद अली (२३) व मोहम्मद अनस जमिल अहमद (२३), सचिन गोस्वामी (३६) व संतोष खोसे अशी त्यांची नावे आहेत. सचिन व संतोष हे पिस्तूल खरेदीसाठी पुण्याहून नवी मुंबईत आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान कुरकानअली त्यागी (४७) हा पोलिसांच्या हाती लागला. त्याला मेरठ येथून अटक केली असून तोच अवैध शस्त्रे पुरवायचा, असे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. त्याच्याकडूनही पोलिसांनी एक विनापरवाना पिस्तूल जप्त केले. कुरकानअलीनेच कल्याण - डोंबिवलीचे नगरसेवक महेंद्र गायकवाड यालाही शस्त्र विकल्याची माहिती चौकशीदरम्यान तुर्भे पोलिसांना दिली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने गायकवाड याच्यासह सुधीर जाधव या त्याच्या मावस भावाला अटक केली. सुधीर हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली आहे. त्यानेच कुरकानअलीला संपर्क साधून ५५ हजार रुपयांना अवैध पिस्तूल खरेदी करून दिले होते. पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या सचिन गोस्वामी याने लोणावळा येथे पब व क्लबसाठी जमीन खरेदी केली आहे. त्याठिकाणी पब चालवत असताना कोणाचा अडथळा नको यासाठी त्याने हे पिस्तूल घेतले होते, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे व तपास पथकाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.