शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मतदान न केल्यास कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:57 IST

पनवेल महापालिका हद्दीत मावळ लोकसभा मतदारसंघाकरिता २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत मावळ लोकसभा मतदारसंघाकरिता २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून आपले कर्तव्य पार पाडावे. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करणे ही शासकीय कर्मचाºयांची जबाबदारी आहे. पालिका कर्मचाºयांनी सुट्टीचा उपभोग घेत मतदान न केल्यास त्यांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला आहे. या संदर्भात त्यांनी मंगळवारी परिपत्रक काढले आहे.परिपत्रकात, कर्मचाºयांना मतदानाच्या हक्काची जाणीव करून देत सर्व आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगार यांनी मतदानाची जबाबदारी पार पाडावी, असे नमूद केले आहे. संबंधित अधिकाºयांच्या अधिन काम करणारे अधिकारी, कर्मचारी, हंगामी कर्मचारी, हंगामी कामगार यांनी मतदान केल्याची खातरजमा करून तसे पत्र ३० एप्रिल रोजी संबंधित विभागप्रमुखांनी आयुक्त कार्यालयाकडे सादर करावे. मतदान करण्यासाठी शासनाने सुट्टी दिल्यामुळे दिलेली सुट्टी शासकीय कामकाजाचाच भाग आहे. त्यामुळे मतदान न करणाºया अधिकारी, कर्मचाºयांना २९ एप्रिल या एका दिवसाचे वेतन मिळणार नाही आणि याकरिता कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा खुलासा मागविण्याची आवश्यकता नसल्याचे आयुक्त देशमुख यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शासकीयस्तरावर अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्या दृष्टीने महापालिकेनेही कंबर कसली आहे.आदेश न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई?शासनाने मंजूर केलेली पगारी सुट्टी लक्षात घेता, २९ एप्रिल रोजी गैरहजर राहणे व मतदान न करणे, म्हणजेच काम न करता वेतन घेण्यासारखे आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाºयांवर शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र अशी नोंद घेण्याचे आवाहन परिपत्रकात आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळ