शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट असते तर वाचला असता जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 01:25 IST

अकरा महिन्यांत ९९ अपघात : ८९ दुचाकीस्वारांचा मृत्यू

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : अकरा महिन्यांत नवी मुंबईसह पनवेल व उरण क्षेत्रात दुचाकींचे ९९ अपघात घडले आहेत. त्यामध्ये ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी अनेकांनी हेल्मेटचा वापर केलेला नसल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन प्राण गमावले आहेत. रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. दुचाकीस्वारांकडून हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, अपघात झाल्यास शरीराच्या इतर भागासह डोक्यालाही जखम होत आहे. अशा वेळी डोक्याला झालेली जखम अनेकांच्या जिवावर बेतत आहे. मात्र, हेल्मेट हे सुरक्षेचे साधन म्हणून पाहण्याऐवजी कायद्याची सक्ती म्हणून बघितले जात आहे. यामध्ये पळवाट म्हणून हेल्मेट न घालता पोलिसांना चकमा देण्यात दुचाकीस्वार पटाईत झाले आहेत, परंतु अपघातामध्ये मृत्यूला चकमा देऊ शकलेले नाहीत. परिणामी वेगापाई हे लोक मृत्यूला आमंत्रण देत आहेत. सायन-पनवेल मार्गावर सर्वाधिक अपघात सायन-पनवेल मार्गावर सर्वाधिक अपघात घडले आहेत. मुंबई-पुण्याला जोडणारा हा मार्ग असल्याने येथे सतत वर्दळ असते. अशा वेळी वाहतुकीच्या नियमांना बगल देणे अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांसह वाहनांची गती त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. शिस्तीत वाहन चालविण्याऐवजी वेडीवाकडी वाहने पळवून एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा लागलेली असते. यामध्ये एखाद्या वाहनाची धडक लागून होणाऱ्या अपघातात चालकांना प्राण गमवावे लागत आहेत. शहरात घडलेल्या एखाद्या अपघाताच्या वेळी दुचाकीस्वाराने घातलेले हेल्मेट त्याला जीवदान देऊ शकते, परंतु जनजागृती व कारवाई करूनही हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बहुतांश अपघातामध्ये हेल्मेट नसल्याने दुचाकीस्वार अथवा मागे बसल्याचा मृत्यू झालेला आहे. - पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त-वाहतूक