शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना काम करू न दिल्यास यंत्रणेचा बट्ट्याबोळ होईल

By admin | Updated: March 27, 2017 06:32 IST

मंत्र्यांचे बंधू असणे हा गुन्हा नाही. राज्य सरकारने एकदा धोरण ठरविले पाहिजे. चांगल्या अधिकाऱ्यांना काम करू द्यायचे

पनवेल : मंत्र्यांचे बंधू असणे हा गुन्हा नाही. राज्य सरकारने एकदा धोरण ठरविले पाहिजे. चांगल्या अधिकाऱ्यांना काम करू द्यायचे नाही, असेच जर सुरू राहिले तर प्रशासकीय यंत्रणेचा बट्ट्याबोळ होईल, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींनी व्यक्त केले. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांची संघर्ष समितीने भेट घेतली आणि डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा, अशी मागणी केली.डॉ. शिंदे यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि वेळ पडली तर दोन्ही सभागृहात या विषयावर चर्चा केली जाईल, असे आश्वासन उभयतांनी शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी शेकापचे आमदार बाळाराम पाटील हेसुद्धा मुंडे यांच्या दालनात उपस्थित होते.या वेळी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आ. सुरेश लाड यांची देखील भेट शिष्टमंडळाने घेतली. कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळात अ‍ॅड. आर. के. पाटील, उज्ज्वल पाटील, पराग बालड, अ‍ॅड. संतोष सरगर, संतोषी मोरे आणि दर्शना भडांगे आदींचा समावेश होता. (वार्ताहर)