शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील माथाडी वसाहतींना विविध समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 02:31 IST

पालिकेविषयी नाराजी : अंतर्गत कामांचा मुद्दा ऐरणीवर

नवी मुंबई : पालिकेकडून वसाहतीअंतर्गतची कामे होत नसल्याने घणसोलीसह कोपरखैरणेतील माथाडी कामगारांच्या वसाहतींना समस्यांनी ग्रासले आहे. त्यात गटारांच्या रखडलेल्या सफाईमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी सुविधाच मिळत नसल्याने कर का भरायचा ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.सिडको विकसित गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पालिकेने मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामध्ये माथाडी कामगारांसाठी तसेच इतर घटकांसाठी सिडकोने विकसित केलेल्या वसाहतींचा मोठा समावेश आहे. सद्यस्थितीला घणसोली व कोपरखैरणे परिसरात मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांच्या वसाहती आहेत, परंतु या वसाहतींमधील गटारांच्या दुरुस्ती, अंतर्गतच्या रस्त्यांची डागडुजी यावर मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. मात्र, या कामांवर होणाऱ्या खर्चाचा भार पेलण्यास अनेक वसाहती असमर्थ आहेत. त्यामध्ये सिम्लपेक्स वसाहतीचाही समावेश आहे. तिथल्या रहिवाशांकडून पालिकेला प्रतिवर्षी सुमारे २५ लाखांच्या कराचा भरणा केला जातो. त्यानुसार मागील पंधरा वर्षात साडेतीन कोटीहून अधिक कर या परिसरातून पालिकेने जमा केला आहे. मात्र, त्याच्या तुलनेत कसल्याही सुुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. त्यातच गेली बारा वर्षे संपूर्ण घणसोली नोड पालिका व सिडकोच्या हस्तांतरण प्रक्रियेत रखडला होता. सद्यस्थितीला सिम्पलेक्स वसाहतीमधील सर्वच सोसायट्यांमध्ये गटारांसह मलनि:सारण वाहिन्यांच्या दुरुस्ती व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे, परंतु त्याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे सिडको विकसित माथाडी कामगारांच्या वसाहतींमधील रस्ते, गटारे, मलनि:सारण वाहिन्या यांची दुरुस्ती पालिकेने करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी सचिन शिरसाठ यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सिडको विकसित सोसायट्यांमध्ये जलवाहिन्या बदलण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु त्याबरोबरच वसाहतीअंतर्गतच्या रस्त्यांची डागडुजी, गटारे व मलनि:सारण यांच्याही दुरुस्तीची कामे करण्याची गरज शिरसाठ यांनी व्यक्त केली आहे, अन्यथा सोसायट्यांवर खर्चाचा भार वाढून त्याचा भुर्दंड सर्वसामान्य कुटुंबांना बसेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.