शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

जेएनपीटीला प्रदूषणाचा विळखा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:57 IST

जेएनपीटी परिसरातील रासायनिक प्रकल्प आणि ट्रकफार्ममधून सातत्याने होणा-या तेल आणि रासायनिक पदार्थांच्या गळतीमुळे परिसरातील वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे.

मधुकर ठाकूरउरण : जेएनपीटी परिसरातील रासायनिक प्रकल्प आणि ट्रकफार्ममधून सातत्याने होणा-या तेल आणि रासायनिक पदार्थांच्या गळतीमुळे परिसरातील वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. नाले, गटारे यांच्यामधून रासायनमिश्रीत दूषित पाण्यामुळे आणि अतिउग्रदर्पामुळे ये-जा करणाºया कामगारांना नाक मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. सातत्याने नाले, गटारांतून वाहणारे रसायनमिश्रीत दूषित पाणी थेट समुद्रात मिसळत असल्याने जलप्रदूषणाबरोबरच मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषणही होत असल्याने येथील प्राणी, पक्षी आणि माशांसह नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.जेएनपीटी परिसरातील ५०० हेक्टर क्षेत्रात अनेक रासायनिक ट्रकफार्म उभारण्यात आले आहेत. जेएनपीटी बंदरात आलेले रॉकेल, डिझेल, नाफ्ता, क्रूड आॅइलसारखे रासायनिक द्रव पदार्थ पाइपलाइनद्वारे येथील विविध कंपन्यांच्या ट्रकफार्ममध्ये जमा केले जातात. त्यानंतर टँकर अथवा अन्य साधनांमार्फत इतरत्र पाठविले जातात. नामांकित रासायनिक कंपन्यांकडून सातत्याने निष्काळजीपणा दाखविला जात असल्याने अनेक वेळा ट्रकफार्ममधूनच तेलगळतीचे प्रकार होतात. तर काही वेळा तेलचोर माफियांकडून तेलवाहिन्यांनाच टॅप लावून, फोडून चोरीचे प्रकार घडतात. यामुळे मात्र होणाºया तेलगळतीमुळे रासायनिक मिश्रीत दूषित पाणी, रसायने थेट नाल्यात येऊन मिसळतात. गटारे, नाल्यामार्फत हे रासायनिक मिश्रीत दूषित सांडपाणी थेट येथील समुद्रात आणि नजीकच्या खाड्यात मिसळले जाते. ज्या समुद्र आणि खाड्यांत येथील स्थानिक मच्छीमार मासेमारी करून आपल्या कुटुंबीयांचा चरितार्थ चालवितात. दूषित पाण्यामुळे मात्र खाड्या आणि समुद्रात जलप्रदूषण होत असल्याने मासेमारीच धोक्यात येत आहे. त्याशिवाय वायुप्रदूषणामुळे प्राणी, पक्षी आणि माशांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.चार-पाच दिवसांपासून जेएनपीटीतील ट्रकफार्म परिसरात पावसाने भरलेली गटारे, नाल्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात तेलतवंग दिसून आल्याची माहिती जेएनपीटी कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील यांनी दिली. न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याजवळील रस्ते ते जेएनपीटी परिसरात ट्रकफार्मजवळील पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाहने जातात. तेलमिश्रीत पाणी सभोवार उडते. परिसरात दूषित रासायनिक तेलाचा मोठ्या प्रमाणात उग्र दर्प येत असल्याने कामगारांना या मार्गावरून ये-जा करणेही कठीण झाले आहे.