बदलापूर : कात्रपच्या साई मंदिरातून निघणा:या पायी पालखीत दोन हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत. ही पालखी बुधवारी सकाळी बदलापुरातून निघाली असून 18 नोव्हेंबरला शिर्डीत दाखल होणार आहे. मुंबईनंतर सर्वात मोठय़ा पायी पालखीचा मान बदलापूरच्या ओम साईभक्त मंडळाला मिळाला आहे.
या मंडळाने 22 वर्षापूर्वी पदयात्र पालखी सोहळ्याला सुरुवात केली. दरवर्षी या पदयात्रेत भाविकांची संख्या वाढत जाते. यंदा हा आकडा दोन हजारांवर गेला आहे.
मंडळाचे संस्थापक जनार्दन विशे, अध्यक्ष विष्णू कोंडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पालखीचे नियोजन करण्यात येते. पालखीत सहभागी झालेल्या साईभक्तांच्या राहण्याची, नाश्ता, जेवणाची सोय मंडळाच्या वतीने होते. अत्यंत शिस्तबद्ध रितीने जाणारी ही पालखी सातव्या दिवशी सायंकाळी शिर्डीत पोहोचते. (प्रतिनिधी)