पनवेल : प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून फेकून देणाऱ्या दोघांना तळोजा पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजूबाई व प्रियकर कार्तिक उर्फ कौशिक अशी आरोपींची नावे आहेत. दोघांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.एस. एम. कन्स्ट्रक्शनचे तळोजा फेज-२ येथे आरसीसी बांधकाम व प्लास्टरचे काम चालू आहे. तेथे आरोसा येथून मनोज मांझी हा पत्नी रंजूबाई, मुलगा व मित्र कार्तिक उर्फ कौशिकसह येथे कामाला आला होता. ७ नोव्हेंबर रोजी कामगारांना कचºयाच्या ढिगाºयातून उग्र वास येऊ लागला. त्यांनी ढिगाºयावरील गोण्या बाजूला करून पाहिले असता एका गोणीमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळला. हा मृतदेह तेथे काम करणाºया मनोजचा असल्याची खात्री पटली. त्यानुसार तळोजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.अघिक चौकशीत मनोज हा मूळचा ओरिसा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची पत्नी रंजूबाई, मुलगा व कार्तिक उर्फ कौशिक हा मित्र असे एस. एम. कन्स्ट्रक्शन या ठिकाणी बांधकामाचे काम करीत असल्याचे समजले. अधिक चौकशीत रंजूबाइ आणि कार्तिक हे गेल्या ही तीन दिवसांपासून गायब असल्याचे समजले. दरम्यान कार्तिक हा तो राहत असलेल्या खोलीवरून दोन प्लास्टिकच्या पिशवीत सामान भरून घाईगडबडीत निघून जात असताना पोलिसांनी त्यास पकडले. त्यानंतर खरा प्रकार समोर आला. रंजूबाई आणि कार्तिकचे प्रेम होते. मनोज आणि रंजूबाईत यावरून नेहमी नेहमी भांडणे होत असत. म्हणून पत्नी रंजूबाई व कार्तिक यांनी रागाच्या भरात मनोजचे उशीच्या साहाय्याने तोंड दाबून त्याला ठार मारले व त्याचा मृतदेह गोणीत भरून फेकून दिला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 05:51 IST