शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

एसटी कामगारांच्या संपामुळे हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 07:00 IST

महाराष्ट्रात एसटी कामगारांच्या संपामुळे दिवाळीत राज्यात हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. संप लांबल्यास काय खायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

पनवेल : महाराष्ट्रात एसटी कामगारांच्या संपामुळे दिवाळीत राज्यात हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. संप लांबल्यास काय खायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे मुख्यमंत्र्यांना तोडगा काढण्याचे आवाहन, तसेच खासगी गाडीवाल्यांकडून मात्र लूटमार सुरू आहे.महाराष्ट्रात एसटी कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप सुरू झाला. २४ तासांनंतरही त्यावर तोडगा निघाला नाही. महाराष्ट्रात परिवहन महामंडळाची २५० आगारे आहेत. त्यांच्या अंतर्गत अनेक स्थानके आहेत. त्यांच्या परिसरात अनेक जण छोटे-मोठे धंदे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. सरासरी एका आगारात ३०-४० जण तर स्थानकावर १५ -२० जण धंदा करीत असतात. कामगारांच्या संपामुळे गाड्या बंद असल्याने प्रवासी येत नाहीत, त्यामुळे राज्यातील हजारो लोकांचा रोजगार बंद झाला आहे. एसटी स्थानकावर रिक्षांच्याही रांगा लागलेल्या दिसत आहेत.दिवाळीमध्ये गाड्यांना गर्दी असल्याने चांगला धंदा होतो. मात्र, आज घरी बसावे लागल्याने हातावर पोट असलेल्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. संप लांबल्यास काय करायचे, असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे.पनवेल स्थानकावरील वृत्तपत्र विक्रेत्यांनी मंगळवारपासून आमचाही धंदा निम्मा झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी मागणी के ली आहे.मी पनवेल एसटी स्थानकात दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत गाडीत शेंगदाणे विकून दिवसाला १०० रु पये मिळवायचो, दिवाळी सिझनमध्ये २५०-३०० रु पये मिळायचे. घरात पाच माणसे, मी एकटाच कमवणारा. आज घरात बसून आहे. संप सुरू राहिल्यास काय करावयाचे हा माझ्या पुढे प्रश्न आहे.- केशव रायकरमी १० वर्षांपेक्षा जास्त काळ पनवेल स्थानकावर केळी विकत आहे. रोज ५ ते ६ क्रेट केळी विकत होते. मंगळवारपासून २ क्रेट केळी विकली गेली नाहीत.- सखूबाई पराडेआम्ही पनवेल स्थानकावर रिक्षाचा धंदा करतो. एका पाळीचे मालकाला भाडे २०० ते २५० द्यावे लागते. १५० रु पयांचा गॅस पेण, अलिबाग आमचे भाडे जास्त असल्याने प्रवाशाला परवडत नाही. एसटी बंद असल्याने प्रवासी ये-जा नसल्याने दिवसाला ५०० रु पये धंदा होत नाही.- संपत वायबसे,जलिंदर आवटे,रिक्षाचालकएनएमएमटी बसेस फूलसातव्या वेतन आयोग लागू करावा, याकरिता पुकारण्यात आलेला संप बुधवारीही मिटला नाही. त्यामुळे अतिशय गजबज असणाºया पनवेल बसस्थानकावर दुसºया दिवशी शुकशुकाट दिसून आला. लोकल प्रवाशांकरिता एनएमएमटी, केडीएमएमटी आणि बेस्टच्या गाड्या फूल दिसून आल्या. बुधवारी संप सुरू राहणार असल्याने दीपावलीनिमित्त गावी जाणाºया प्रवाशांनी खासगी बसेसचा आधार घेतला. त्याचबरोबर पुणे बाजूकडे प्रवासी वाहतूक करणारी अनेक खासगी वाहने महामार्गावर उभी होती. द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशद्वारावर खासगी वाहनांची वाट पाहणारे प्रवासी सकाळी मोठ्या प्रमाणात दिसून आले. दूध टँकर, टेम्पोतून अनेकांनी पुणे, चाकण, अहमदनगर, सातारा, सोलापूरपर्यंत प्रवास केला. त्यामुळे पनवेल बसस्थानकावर मंगळवारच्या तुलनेत बुधवारी शुकशुकाट दिसून आला. काही प्रवाशांचा अपवाद वगळता, कोणीही स्थानकात फिरकले नाही. पनवेल आरटीओने माणगावपर्यंत काही खासगी बसेसची व्यवस्था केली होती. या सेवेला विरोध होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :ST Strikeएसटी संप