उरण : उरण परिसरात विविध रस्त्यांवर अवैध पार्किंग करून ठेवण्यात आलेले सुमारे १०० ट्रक, ट्रेलर्स आदी वाहनांची काही अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिराने घडलेल्या या प्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञातांचा शोध सुरू केला आहे.उरण-आम्रमार्ग आणि जेएनपीटी-पळस्पे, येथील द्रोणागिरी नोड आणि या एनएचबी-४ या राष्ट्रीय महामार्गावर शेकडो अवजड वाहने अवैधरीत्या उभी करून दुतर्फा रस्त्यांवर पार्किंग करून ठेवली जातात. गुरुवारी (१९) रात्री उशिरा अशाच अवैध पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांची दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी तोडफोड केली आहे. उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी घटनास्थळी पहाणी के ली.
उरण-पनवेल महामार्गावर शेकडो वाहनांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 01:12 IST