शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो भूखंडांवर येणार टाच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 02:51 IST

करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करणाºया भूखंडधारकांवर सिडकोने आता कारवाईचा बडगा उगारला आहे.

कमलाकर कांबळेनवी मुंबई- करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करणाºया भूखंडधारकांवर सिडकोने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला सानपाडा येथे दिलेल्या भूखंडाचे वाटप गेल्या आठवड्यात रद्द करण्यात आले. येत्या काळात अशा प्रकारच्या अनेक भूखंडांवर टाच येण्याची शक्यता सिडकोच्या वरिष्ठ सूत्राने वर्तविली आहे. त्यामुळे विविध सामाजिक उपक्रमांसाठी सवलतीच्या दरात भूखंड पदरात पाडून घेणाºया व निर्धारित वेळेत त्याचा विनियोग न करणाºया भूखंडधारकांचे धाबे दणाणले आहे.शहराची निर्मिती करताना सिडकोने विविध प्रयोजनासाठी भूखंड आरक्षित ठेवले आहेत. त्यातील काही भूखंड शिक्षण संस्था, अभियांत्रिकी कॉलेजेस, रुग्णालये व सामाजिक संस्थांना अगदी नाममात्र दरात दिले आहेत. या भूखंडाचे वाटप करताना सिडकोने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे संबंधितांना बंधनकारक आहे. परंतु मागील दीड-दोन दशकांत यातील अनेक भूखंडधारकांनी सिडकोबरोबर झालेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींना केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले आहे.विशेष म्हणजे भूखंडाचा करार झाल्यानंतर नियमानुसार दोन वर्षांच्या आत बांधकाम करणे गरजेचे असते. परंतु अनेक भूखंडधारकांनी या नियमाला केराची टोपली दाखविली आहे. तर काहींनी कोणतीही परवानगी न घेता भूखंडाच्या वापरात बदल केला आहे. यात शैक्षणिक संस्थांचे प्रमाण सर्वाधिक आहे.अशा शिक्षण संस्थांसाठी मध्यंतरी सिडकोने अभय योजना जाहीर केली होती. परंतु या योजनेलाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता नियमांना केराची टोपली दाखविणाºया शिक्षण संस्थांसह रुग्णालये व सामाजिक संस्थांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत सिडकोने दिले आहेत.भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला दिलेला भूखंड गेल्या आठवड्यात सिडकोने रद्द केला आहे. भूखंड वाटप रद्द केल्यानंतर लगेच त्याच्या विक्रीसाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. येत्या काळात अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाºया भूखंडांची झडाझडती घेऊन दोषी आढळणाºयांवर धडक कारवाई करण्याचे संकेत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने भूखंडाचा वापर करणाºया शिक्षण संस्था, रुग्णालये व सामाजिक संस्थांना चाप लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.>संस्थाचालकांची मनमानीसिडकोने अनेक शिक्षण संस्थांना शैक्षणिक उपक्रमासाठी अल्पदरात मोक्याचे भूखंड दिले आहेत. तसेच रुग्णालयासाठी अनेक बड्या संस्थांना भूखंडांची बिदागी दिली आहे. असे असले तरी यातील अनेक संस्थांनी सिडकोच्या करारनाम्यातील अटी व शर्तींना फाटा दिल्याचे दिसून आले आहे. नियमानुसार शैक्षणिक प्रवेशात स्थानिकांना प्राधान्य किंबहुना त्यांच्यासाठी राखीव कोटा ठेवणे गरजेचे आहे. मात्र बहुतांशी शिक्षण संस्थांनी या नियमाला बगल देत शिक्षणाचे व्यापारीकरण केल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय सुविधा देताना स्थानिक व गरजूंना २0 टक्के खाटा राखीव ठेवून त्यांना विनामूल्य उपचार देणे बंधनकारक आहे. मात्र करारनाम्यातील या नियमालासुद्धा केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोने अशा संस्थांच्या मनमानीला चाप लावण्याची गरज असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे.>याअगोदर कारवाई झालेले भूखंडअटी व शर्तीचा भंग करून भूखंडाचा व्यावसायिक वापर केल्याचा ठपका ठेवत दोन वर्षांपूर्वी सिडकोने वाशी रेल्वे स्थानकाजवळ अरुणाचल प्रदेश सरकारला अतिथीगृहासाठी दिलेला भूखंड रद्द केला होता. तशी नोटीस संबंधितांना पाठविण्यात आली होती.सार्वजनिक रुग्णालयासाठी सिडकोने महापालिकेला वाशी सेक्टर १0 येथे आठ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड दिला आहे. परंतु महापालिकेने यातील एक लाख चौरस फुटांची जागा परस्पर हिरानंदानी हेल्थ केअरला दिली. या प्रकरणात अटी व शर्तीचे महापालिकेने उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सिडकोने सदर भूखंड वाटप रद्द करण्याची कारवाई केली होती.वाशी रेल्वे स्थानकासमोरील तुंगा हॉटेललाही सिडकोने नोटीस बजावून त्यांचे भूखंड वाटप रद्द केले होते.